Solapur News : 41 देशात बंदी असलेल्या कुत्र्याचा सोलापुरातील कामगारावर हल्ला, अक्षरशः लचके तोडले
Dog Attacked : कुत्र्याच्या हल्ल्यात आसिफ गंभीर जखमी असताना ही उपस्थितपैकी कोणीही कंपाउंडच्या आत जाऊन त्याला वाचवण्याची हिंमत दाखवू शकला नाही.
![Solapur News : 41 देशात बंदी असलेल्या कुत्र्याचा सोलापुरातील कामगारावर हल्ला, अक्षरशः लचके तोडले dog banned in 41 countries attacked worker in Solapur Solapur News : 41 देशात बंदी असलेल्या कुत्र्याचा सोलापुरातील कामगारावर हल्ला, अक्षरशः लचके तोडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/14/183826994074d76c4554c77073ac3ebc1697255103616737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : शहरील एका तरुणावर पाळीव कुत्र्याने हल्ला (Dog Attacked) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत कुत्र्याने तरुणाचे अक्षरशः लचके तोडलेत. सोलापुरातील लक्ष्मीनारायण टॉकीजजवळ हा प्रकार घडलाय. सुदैवाने हा तरुण या हल्यात बचवलाय. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. आसिफ उस्मान मुल्ला असे या जखमी तरुणाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, एमआयडीसी परिसरात असलेल्या लक्ष्मीनारायण टॉकीज समोर असलेल्या एका व्यावसायिकने पिट बुल प्रजातीचे कुत्रा पाळला आहे. यावेळी, आसिफ मुल्ला हा कंपाउंडच्या आत गेल्यानंतर पिट बुलने त्याच्यावर हल्ला चढवला आहे. तर, हल्ला करणाऱ्या या कुत्र्याने आसिफ याच्या अंगाचे अक्षरशः लचके तोडलेत. कुत्र्याच्या हल्ल्यात आसिफ गंभीर जखमी असताना ही उपस्थितपैकी कोणीही कंपाउंडच्या आत जाऊन त्याला वाचवण्याची हिंमत दाखवू शकला नाही. मात्र, आसिफ स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करत होता. काही वेळानंतर आसिफ यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान आसिफ मुल्ला हा कंपाउंड ओलांडून का गेला हे मात्र समजू शकले नाही.
41 देशात पिट बुल पाळण्यास बंदी
पिट बुल प्रजातीच्या श्वान पाळण्यासाठी जगातील अनेक देशात बंदी आहे. देशात देखील उत्तरप्रदेश आणि दिल्ली सारख्या राज्यात पिट बुल पाळण्यावर बंदी आहे. प्रणिमित्रांच्या मते बिबट्यानंतर सर्वाधिक धोकादायक चावा हा पिट बुलचा मानला जातो. बाकी कुत्र्यांच्या तुलनेत पिट बुलचा चावा हा गंभीर आणि मोठा असतो. त्यामुळेच जगातील 41 देशात पिट बुल पाळण्यास बंदी आहे.
तरुण गंभीर जखमी...
एमआयडीसी परिसरात असलेल्या लक्ष्मीनारायण टॉकीज समोर असलेल्या एका व्यावसायिकने पिट बुल प्रजातीचे कुत्रा पाळला आहे. दरम्यान, याच कुत्र्याने आसिफ नावाच्या तरूणावर हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद देखील केली. मात्र, या गर्दीतून या तरुणाला वाचवण्यासाठी एकही व्यक्ति पुढे आला नव्हता. त्यामुळे या हल्ल्यात आसिफ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)