बीएड सीईटी परीक्षेला सर्व्हर डाउनचा फटका, दोन तास उशिराने पेपर सुरु, विध्यार्थ्यांचा परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ
CET Exam : बीएडच्या (BEd) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेत (CET exam) गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जवळपास दोन तास उशिराने विद्यार्थ्यांचे पेपर सुरू झाले.
सोलापूर : शिक्षणशास्त्र अर्थात बीएडच्या (BEd) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेत (CET exam) गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जवळपास दोन तास उशिराने विद्यार्थ्यांचे पेपर सुरू झाले. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर एकच गोंधळ केला.
सोलापुरातील कीर्ती कम्प्युटर्स या परीक्षा केंद्रात बीएडच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होती. दुपारी दोन वाजता ही परीक्षा सुरु होने अपेक्षित होते. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने जवळपास दोन तास उशिरा ही परीक्षा सुरु झाली. सोलापुरात होणाऱ्या या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी हे परगावहून आले होते. काही विद्यार्थिनी आपल्या चिमुकल्या बाळांसह परीक्षेला आल्या होत्या. परीक्षा केंद्राजवळ कोणतीही सुविधा नसल्याने अनेकांना त्रास करवा लागल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
राज्यात वेगवेगळ्या अभ्यास क्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जात आहेत. मात्र परीक्षांमधील गोंधळ अद्याप संपलेला नाहीये. सोलापुरात आज शिक्षणशास्त्र अर्थात बीएडच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेत गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जवळपास दोन तास उशिराने विद्यार्थ्यांचे पेपर सुरू झाले. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर एकच गोंधळ केला. सोलापुरातल्या कीर्ती कम्प्युटर्स या परीक्षा केंद्रात बीएडच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होती. दुपारी दोन वाजता ही परीक्षा सुरु होने अपेक्षित होते. मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने जवळपास दोन तास उशिरा ही परीक्षा सुरु झाली.
परीक्षा दोन वाजता सुरु होणार असल्याने एक तास आधी रिपोर्टींग टाइम असते. त्यामुळे अनेक विद्यार्थी 12 ते 1 या वेळेत केंद्रावर आले होते. त्यात अनेक विद्यार्थी हे परगावहून आले होते. उस्मानाबाद, बार्शी या ठिकाणाहून देखील विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. तर काही विद्यार्थीनी आपल्या चिमुकल्या बाळांसह परीक्षेला आल्या होत्या. मात्र दोन वाजता जेव्हा परीक्षा सुरु झाली तेव्हा वेबसाईटवर लॉगिन होतं नव्हते. सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले.
या अडचणीत भर म्हणून की काय, परीक्षा केंद्रावरील वीज ही गायब झाली. इन्वर्टरची तत्काळ सोय न झाल्याने देखील परीक्षा सुरू होण्यासाठी विलंब झाल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. परीक्षा केंद्राजवळ कोणतीही सुविधा नसल्याने अनेकांना त्रास करवा लागल्याचे देखील विद्यार्थ्यांनी सांगितले. या सर्व गोंधळामध्ये जवळपास दोन तास उशिरा पेपर सुरू झाला. झालेल्या गोंधळामुळे परीक्षा देण्याची मानसिकता देखील नव्हती. दिवसभर केवळ विद्यार्थ्यांची तारांबळ झाली. कसंबसं आम्ही परीक्षा दिली आहे.' अशी माहिती परीक्षा देण्यासाठी आलेल्या डॉ. वंदना भानप यांनी दिली.
'मी माझ्या सहा महिन्याच्या मुलीला घरी सोडून आले आहे. दुपारी 12 वाजता मी उस्मानाबादहू सोलापूरला परीक्षेसाठी आले होते. विदयार्थीनींना स्वच्छता गृहासाठी जायचे होते, तेव्हा केंद्र चालकांनी व्यवस्थित वागणूक देखील दिली नाही.' अशी प्रतिक्रिया सय्यद नाज बिन फातिमा या विद्यार्थीने दिली.
दरम्यान, आमचे काम केवळ इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणे आहे. परीक्षा घेणार ही यंत्रणा ही पूर्णपणे वेगळी आहे. दोन तारखेपासून आमच्याकडे सीईटी परीक्षा सुरू आहेत. आज पर्यंत कोणताही गोंधळ झालेला नव्हता. आजचा गोंधळ हा केवळ सर्व्हर डाऊन झाल्यामुळे झाला.' अशी प्रतिक्रिया ज्या ठिकाणी परीक्षा झाली त्या कीर्ती कम्प्युटरचे संचालक अशोक यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
CUET Admit Card 2022: CUET PG 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच जारी होणार, येथे पाहा नवी अपडेट
RTMNU : पदव्युत्तर प्रवेशपरीक्षेनंतरही जागा रिक्त राहण्याची शक्यता; एमपीएससीमुळे वेळापत्रकात बदल
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI