एक्स्प्लोर

RTMNU : पदव्युत्तर प्रवेशपरीक्षेनंतरही जागा रिक्त राहण्याची शक्यता; एमपीएससीमुळे वेळापत्रकात बदल

21 तारखेला एमपीएससीची पूर्वपरीक्षा आल्याने पुन्हा एकदा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 21 तारखेला होणारी परीक्षा आता 1 सप्टेंबर रोजी घेण्यात येईल.

नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपरीक्षा पार पडली. उपलब्ध जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांकडून फार कमी अर्ज प्राप्त झाले. यातही विद्यार्थ्यांनी परीक्षेला मोठ्या प्रमाणावर दांडी मारली. अर्ज कमी आणि त्यातही विद्यार्त्यांची दांडी यामुळे बहुतांश जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागपूर विद्यापीठाच्या मूळ योजनेनुसार 12 ऑगस्टला पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा आयोजित केली जाणार होती. मात्र, उपल्बध जागाच्या तुलनेत फार कमी अर्ज प्राप्त झाल्याने विद्यापीठाने ही परीक्षा 18 ऑगस्टला घेतली. अतिरिक्त वेळ देऊनही मानसशास्त्रसारख्या काही विषयांचा अपवाद वगळता विविध अभ्यासक्रमांतील केवळ 50 ते 70 टक्के जागांसाठीच अर्ज प्राप्त झाले. नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत एकूण अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त 60 ते 70 टक्के विद्यार्थ्यांनीच उपस्थिती नोंदविली. विद्यापीठातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अर्ज कमी असले तरी सर्वांची परीक्षा घेण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून दिले गेले होते. उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याने सर्वांनाच प्रवेश दिला जाईल, हे निश्चित आहे. केवळ एक औपचारिकता म्हणून विद्यापीठाने प्रवेशपरीक्षा आयोजित केली जात आहे.

एमकेसीएलचे परीक्षा समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आधीच प्रवेश घेतला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. विद्यापीठाची परीक्षा सुरळीतपणे पार पडली असून कुठलाही गैरप्रकार घडल्याची तक्रार प्राप्त झालेली नाही.

Baba Tajuddin Urs : जगभरातून 15 लाख भाविक होणार सहभागी, बाबा ताजुद्दीन शताब्दी वर्ष उर्स 21 ऑगस्टपासून

विषयनिहाय प्राप्त अर्ज

एमएससी 1158
एमए 650
एमकॉम 127
एलएलएम 112
एमएसडब्लू 53
एमलिब 29

एमपीएससीमुळे वेळापत्रकात बदल

परवा (ता. 21 ऑगस्ट रोजी) रविवारी होणाऱ्या विद्यापीठाच्या सर्व परीक्षा राज्य सेवा आयोगाची पूर्वपरीक्षा असल्याने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 10 ऑगस्टला नियोजित परीक्षा विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे 21 तारखेला घेण्याचे विद्यापीठाने ठरविले होते. मात्र, 21 तारखेला एमपीएससीची पूर्वपरीक्षा आल्याने पुन्हा एकदा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 21 तारखेला होणारी परीक्षा आता 1 सप्टेंबर रोजी घेण्यात येईल. त्याप्रमाणेच 16 ऑगस्टची परीक्षा 27 ऑगस्टला तर 17 ऑगस्टची परीक्षा 28 ऑगस्टला घेतली जाईल. कम्पल्सरी इंग्लिशचा 27 ऑगस्टचा पेपरदेखील आता 30 ऑगस्टला घेण्यात येणार आहे.

RTMNU Fees Hike : नागपूर विद्यापीठाची शैक्षणिक शुल्कवाढ, भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे प्र-कुलगुरूंना निवेदन

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget