एक्स्प्लोर

स्वच्छंदी वागण्यात अडसर ठरलेल्या वडिलांची मुलाकडून आई आणि मित्रांच्या मदतीने हत्या

नात्यांमध्ये दुरावा आला की आपल्या स्वार्थासाठी आणि द्वेषातून मनुष्यप्राणी कुठल्या स्तराला पोहोचेल याची शाश्वती नाही. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडलेल्या एका घटनेने बाप-लेक आणि पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासला आहे.

सोलापूर - लाडावलेल्या मुलाने आईच्या मदतीने चक्क आपल्या जन्मदात्या बापाचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यात घडला आहे. विशाल घुगे असं या आरोपी मुलाचे नाव आहे. मृत अंगद घुगे हे सोलापुरातल्या बार्शी येथील रहिवासी असून कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत होते. 14 जानेवारीपासून अंगद घुगे हे आपल्या बेपत्ता होते. त्यामुळे त्यांचा तपास सुरु असताना कुर्डुवाडी तालुक्यातील लऊळ गावाजवळील शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या माहितीनुसार घुगे यांची तीष्ण हत्याराने हत्या करुन ओळख पटू नये यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचं प्रथमदर्शनी दिसत होते. मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जळाल्याने लागलीच ओळख पटली नाही. मात्र पोलिसांच्या तपासात मृत व्यक्ती बार्शी येथील कृषी सहाय्यक अंगद घुगे असल्याचे समोर आले. यामध्ये पोलिसांनी संशयावरुन मुलगा विशाल घुगे यास अटक करुन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. धक्कादायक म्हणजे यात ग्रामसेवक असलेली आई जयश्री दराडे-घुगे ही मुख्य सूत्रधार असल्याचे ही समोर आले. मुलगा विशाल याच्या मित्रांनी विश्वासात घेऊन त्यांना घुगे यांना संपवण्यासाठी 10 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. बायकोच्या लाडामुळे मुलगा विशाल कुमार्गाला लागला असा दोष मृत अंगद घुगे हे नेहमी देत होते. घटनेच्या काही दिवसाआधीच विशालने महागडा मोबाईल खरेदी केला होता. तर दीड लाख रुपयांची दुचाकी घेतली होती. यावरुन घुगे यांचे पत्नी जयश्री, मुलगा विशाल यांच्यासोबत वाद देखील झाले होते. विशाल यांच्या स्वच्छंदी वागण्यास घुगे यांचा अडसर होत असल्यामुळे हत्येच्या सुपारी दिल्याची माहिती समोर येत आहे. विशालने दिलेल्या माहिती वरुन आई जयश्री घुगे यास पोलिसांनी अटक केली आहे. तर गुन्ह्यात सहभागी असलेल्या विकी शिंदे, अतुल गांधले या दोघांचा ही पोलिस शोध घेत असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. यामध्ये आणखी गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान आरोपी जयश्री घुगे या ग्रामसेविका असून त्यांच्याकडे सोलापुरातील रुई आणि रातंजन ग्रामपंचातीचा कारभार होता. खुनाच्या घटनेपूर्वी चार दिवस आरोपी त्यांच्या मागावर होते. मात्र दोन वेळी त्यांच्या हत्येचा कट फसला होता. मात्र तिसऱ्या वेळी घुगे दुर्दैवी ठरले. खुनासाठी आरोपींनी स्कॉरपियो गाडीचा वापर केला होता. गाडीचा वापर केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी गाडी धुण्यात आली होती. मात्र गाडीच्या स्पीकरच्या भागावर रक्ताचे डाग पोलिसांना आढळले. त्यामुळे हत्येचा उलगडा होऊ शकला. या प्रकरणी सूत्रधार असलेल्या आरोपी ग्रामसेवक जयश्री घुगे यांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता पोलिसांच्या चौकशीत हत्येचा घटनाक्रम उलघडण्यात मदत होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आई-वडील उच्चशिक्षित आणि आर्थिक परिस्थिती सधन असताना वाममार्गामुळे मुलानेच आईच्या मदतीने केलेल्या या हत्येमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. संबंधित बातम्या  

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
Horoscope Today 31 October 2026: आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
मोठी बातमी! देशभरात होणाऱ्या जनगणनेच्या तारखा जाहीर, सरकार ऑनलाइन पोर्टल सुरु करणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
मोठी बातमी! देशभरात होणाऱ्या जनगणनेच्या तारखा जाहीर, सरकार ऑनलाइन पोर्टल सुरु करणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
BMC Demolition Action : भाजपच्या तक्रारीनंतर ठाकरेंचे नगरसेवक तुळशीराम शिंदे अडचणीत! गोरेगावमधील घरावर पालिकेचा बुलडोझर चालणार; कारवाईची नोटीस बजावली
भाजपच्या तक्रारीनंतर ठाकरेंचे नगरसेवक तुळशीराम शिंदे अडचणीत! गोरेगावमधील घरावर पालिकेचा बुलडोझर चालणार; कारवाईची नोटीस बजावली

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget