Golden jacka : विहीरीत पडला सोनेरी कोल्हा, अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात वन विभागाला यश
मालवणमधील धामापूर पेठवाडीत विहीरीत सोनेरी कोल्हा (Golden jacka) पडल्याची घटना घडली. अथक प्रयत्नानंतर कोल्ह्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलं आहे.
Golden jacka : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील मालवणमधील धामापूर पेठवाडीत विहीरीत सोनेरी कोल्हा (Golden jacka) पडल्याची घटना घडली. धामापूर पेठवाडीतील दिनेश काळसेकर यांच्या विहीरीमध्ये हा कोल्हा पडला होता. ग्रामस्थ सुशीलकुमार घाडी यांनी हा सोनेरी कोल्हा विहिरीत पडल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी लगेच याबाबत वनविभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र कुडाळच्या रेस्क्यू पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर 15 ते 20 फूट खोल विहिरीतून या कोल्ह्यास सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जंगली भागातून भक्ष्याच्या मागे धावत आलेले बिबटे मानवी वस्तीत अनेक वेळा आले आहेत. तसेच बिबटे विहिरीत पडल्याच्या घटना देखील अनेकदा घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भक्ष्याच्या मागे धावताना अंदाज न आल्यानं कठडा नसलेल्या या विहिरीत सोनेरी कोल्हा पडला असावा असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या विहिरीत पाण्याची पातळी सुमारे 4 ते 5 फूट होती. त्यामुळं विहिरीतून बाहेर काढताना मोठ्या अडचणी येत होत्या. अखेर अथक प्रयत्नानानंतर वन विभागानं पिंजऱ्याद्वारे कोल्ह्याला बाहेर काढण्यात यश आले.
दरम्यान, ग्रामस्थांनी वेळीच माहिती वनविभागाला देऊन बचाव कार्यास देखील मदत केली. त्यामुळं या सोनेरी कोल्ह्याचा जीव वाचवता आला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची वैद्यकीय तपासणी करिन त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
सोनेरी कोल्हा
सोनेरी कोल्हा (Golden jacka) हा एक लांडग्यासारखा कॅनडिड आहे. जो दक्षिणपूर्व युरोप, नैऋत्य आशिया, दक्षिण आशिया आणि दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रदेशात सापडतो. अरेबियन लांडगाच्या तुलनेत, जो सर्वात लहान राखाडी लांडगा (कॅनिस ल्यूपस) आहे. सोनेरी कोल्हा लहान आहे. त्याचे लहान पाय, लहान शेपूट आणि टोकदार तोंड असते. सोनेरी कोल्ह्याचा डगला उन्हाळ्यात फिकट गुलाबी असतो आणि थंडीत तो पिवळ्या रंगात बदलतो. हा आययुसीएनच्या रेड लिस्टवरील किमान कन्सर्न सूचीत गणलेला आहे. याचे कारण याचे अस्तित्व भरपूर उपलब्ध अन्न आणि इष्टतम आश्रय असलेल्या भागात आहे. ह्या ठिकाणी यांची संख्या व्यापक आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Nashik : मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला, थरार कॅमेऱ्यात कैद ABP Majha
- Rural News | नाशिकमध्ये भक्ष्याच्या शोधात बिबट्या विहीरीत पडला | माझं गाव माझा जिल्हा | ABP Majha