(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिंधुदुर्ग समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्याच्या 4 मुलींचा मृत्यू, 1 मुलगा बेपत्ता
देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेले पाचं पर्यटक बुडाले, चौघांचे मृतदेह मिळाले तर एक जण बेपत्ता.
सिंधुदुर्ग : देवगड समुद्र किनाऱ्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. पर्यटनासाठी आलेले पाचं पर्यटक बुडालेत. यामधील चौघांचे मृतदेह मिळाले तर एक जण बेपत्ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व पर्यटक पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे विद्यार्थी आहेत. मृत्यू झालेल्यामध्ये चार मुलींचा समावेश आहे, तर एक मुलगा बेपत्ता आहे.
दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची 35 जणांची सहल देवगड येथे आली होती. समुद्रात आंघोळीसाठी पाच जण उतरले होते. त्यावेळी पाचजण बुडाले आहेत. सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर बेपत्ता आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल आली होती. समुद्र किनाऱ्यावर पोहचल्या नंतर आघोळ करण्याचा मोह पर्यटकांना आवरला नाही. त्यामूळे या गृपमधील काही जण समुद्रात आघोळीसाठी गेले. यातील पाच जण समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. यात चार मुली आणि एक मुलगा होता. चौघांचे मृतदेह मिळाले तर एक जण अजूनही बेपत्ता आहे. या घटनेची माहिती मिळण्यास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह पोलीस सहकारी , तहसीलदार रमेश पवार नगराध्यक्ष साक्षी प्रभू घटना स्थळी दाखल झाले.
पुणे येथील पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती. यातील पाच जण समुद्रात बुडाले. त्यापैकी चौघा मुलींचे मृतदेह सापडले असून एक विद्यार्थी बेपत्ता आहे. हि घटना दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारासची आहे. सर्व मृतदेह देवगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. यात मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर अजूनही बेपत्ता असून पोलिस स्थानिकांच्या मदतीने शोध घेत आहेत.