एक्स्प्लोर

Mumbai Jan Akrosh Morcha : सरपंच संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईत भव्य जनआक्रोश मोर्चा, आंदोलकांचा जत्था आझाद मैदानात

Mumbai Jan Akrosh Morcha : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आज मुंबईत 'सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आज(25 जानेवारी) मुंबईत 'सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी मुंबईत मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान हा मार्ग ठरवण्यात आला असून या मोर्चाला सर्वपक्षीय नेते तसेच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांचे कुटुंबीय उपस्थित झाले आहेत. मुंबईतील मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानपर्यंत असलेल्या या मोर्चाला आता सुरुवात झाली आहे. या मोर्च्यानंतर एक सभा पार पडेल आणि त्यानंतर मोर्चा संपणार आहे. 

दरम्यान, या आंदोलकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाईल आणि त्या ठिकाणी सध्या चौकशीची काय परिस्थिती आहे, ती उघड करा यासाठी ही मागणी करणार असल्याचे पुढे आले आहे. तसेच आज या आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असे देखील सांगण्यात आले आहे. एकंदरीत राज्यातील अनेक भागात निघालेल्या आक्रोश मोर्चानंतर बीड आणि परभणीमधील घटनांची धग आता राज्याच्या राजधानीत पोहचल्याचे चित्र आहे. 

शासनाला आम्ही वारंवार मागणी केली आहे की, जो फरार आरोपी आहे त्याचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक केली जावी. तसेच जे आरोपी पकडले आहेत त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे केली आहे. बीड मधील  सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचे प्रकरण असेल किंवा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचे प्रकरण असेल, यात क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. समाजात या घटनांबद्दल आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने या लोकभावनेची दखल घेऊन सक्त कारवाई करावी, अशी मागणी या मोर्चातील आंदोलकांनी व्यक्त केली आहे.

चौकशीची सद्यस्थिती उघड करा - ज्योती मेटे 

दरम्यान, आजच्या जन आक्रोश मोर्चात शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे, भाजप आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, यांच्यासह देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीय देखील या मोर्चात सहभागी होणार आहे. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान पर्यंत हा जन आक्रोश मोर्चा असणार आहे. सध्या घडीला शेकडोंच्या संख्येने आंदोलक या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे.  या मोर्चानंतर सभेचे देखील आयोजन करण्यात आले असून यावर अनेकांकडून भाषण देखील केले जाणार आहे.  तर लवकरच या आंदोलकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे.  ज्योती मेटे यांनी या संदर्भातील माहिती दिली असून या संपूर्ण प्रकरणाची आतापर्यंतच्या कारवाईची माहिती उघड करा, अशी मागणी ही ज्योती मेटे यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कधी पकडणार असा सवाल देखील त्यांनी केला आहे. 

नैतिकता म्हणून तरी या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा

राज्यात एकीकडे सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाला त्यातील आरोपी प्रशासनानं काही तासात शोधून काढला. मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील वाल्मीक कराडला शोधण्यासाठी 20 - 20 दिवसांचा अवधी लागला. दुसरीकडे याच प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. तो काय देश सोडून गेला असेल का?  शासनाच्या नाकर्तेपणामुळेच प्रकरणात दिरंगाई होत आहे. यात पोलीस प्रशासनाचा कुठलाही दोष नाही. नैतिकता म्हणून तरी या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. यात कदाचित उद्या वाल्मीक कराड हे निर्दोष निघाले तर त्यांनी पुन्हा आपले मंत्रीपद स्वीकारावे. अशी मागणी ही मराठा आंदोलकांनी केली आहे.

हे ही वाचा 

About the author अजय माने

अजय माने
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शेती आपली आई, तिला रासायनिक खतांपासून वाचवावं लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांना आवाहन
शेती आपली आई, तिला रासायनिक खतांपासून वाचवावं लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांना आवाहन
ABP Majha Top 10, 11 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 11 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
Mumbai Indians : मुंबई इंडियन्समध्ये पडली उभी फूट; रोहित-हार्दिक वाद पुन्हा चव्हाट्यावर? सोशल मीडियावर अफवांचा स्फोट
मुंबई इंडियन्समध्ये पडली उभी फूट; रोहित-हार्दिक वाद पुन्हा चव्हाट्यावर? सोशल मीडियावर अफवांचा स्फोट

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
Embed widget