पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पतीचाही मृत्यू; पत्नीच्या रक्षा विसर्जनादिवशी हृदयविकाराचा झटका, सांगलीत हळहळ
Sangli News: पत्नी पाठोपाठ पतीचा देखील मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे मात्र आळसंद गावात शोककळा पसरली आहे.

Sangli News: पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पतीचा देखील मृत्यू झाल्याची घटना घडली. ही धक्कादायक घटना सांगलीच्या खानापूरमधील आळसंदमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार 2 ऑगस्ट रोजी सुनिता जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. रिवाजानुसार मंगळवारी ऐवजी बुधवारी त्यांचे रक्षा विसर्जन करण्यात येणार होते. परंतु त्याच दिवशी पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पती धनाजी जाधव यांना देखील हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पत्नी पाठोपाठ पतीचा देखील मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे मात्र आळसंद गावात शोककळा पसरली आहे.
शासकीय रुग्णालयातील परिचारिकेला मारहाण
दरम्यान, सांगलीत शासकीय रुग्णालयातील परिचारिका विद्या सतीश जाधव (वय 39, रा. पोळ मळा, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. संशयितांनी घरातून 51 हजार रुपयांचा ऐवजही लंपास केला. जाधव यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अजितासिंग कापसे, माही कापसे, रजनीसिंग, सतबिरसिंग व पेपेसिंग (सर्व. रा. पोळ मळा, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मारहाणीचा प्रकार 1 एप्रिल रोजी सायंकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान जाधव यांच्या राहत्या घरी घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विद्या व संशयित अजितासिंग कापसे यांचे यापूर्वी भांडण झाले होते.
Gadchiroli Accident News: रस्त्यावर व्यायाम करताना भरधाव ट्रकनं 6 मुलांना चिरडलं; चौघांचा मृत्यू, गडचिरोलीतील भयावह घटना#GadchiroliNews #accidentnews #gadchiroliaccident #accidentaldeath #police #hospital https://t.co/GDnZrLVuA5
— ABP माझा (@abpmajhatv) August 7, 2025
इतर महत्वाच्या बातम्या























