(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Crime : मुंबई मनपात नोकरी लावतो म्हणून विट्याच्या दोघांना सहा लाखांचा गंडा; विटा पोलिसांत गुन्हा दाखल
Sangli Crime : मुंबई महानगर पालिकेत नोकरीला लावतो म्हणून विट्यातील दोघांना सहा लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. या दोघांवर विटा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sangli Crime : मुंबई महानगर पालिकेत नोकरीला लावतो म्हणून विट्यातील दोघांना सहा लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रमेश भिमराव कांबळे (सध्या रा. फुलेनगर विटा, मुळ गाव मुंबई) आणि कुणाल राजाराम जाधव (रा.102, मुकुंद पॅलेस, ठाकुर वाडी,जुनी डोंबिवली,पश्चिम मुंबई) या दोघांवर विटा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संबंधित फसवणूक झालेल्या मुलाचे वडील किरण प्रताप भिंगारदेवे (वय 60, रा. यशवंतनगर, लेंगरे रोड, विटा) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, येथील भाजीपाला व्यवसायिक किरण भिंगारदेवे यांचा मुलगा सचिन आणि सूरज भस्मे यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदावर नोकरी लावतो म्हणून रमेश कांबळे याने 22 मार्च 2017 रोजी ते चालूवर्षी जून महिन्यापर्यंत आरटीजीएस रोख तसेच चलनाने कुणाल जाधव याच्या नावावर नोटरी करून प्रत्येकी तीन लाख रुपये प्रमाणे एकूण 6 लाख रुपये घेतले.
शिवाय रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेत लिपीक पदावरती हजर राहणेबाबतचे पत्र या दोघांना दिले. मात्र ही दोन्ही पत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने अखेरीस किरण भिंगारदेवे यांनी रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेचे नोकरीची बनावट सही आणि शिक्याचे पत्रे देवून फसवणूक केली असल्याबाबत शनिवारी विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या