Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: नगरपालिका निवडणुकीत कोणाची बाजी? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: उच्च न्यायालयाच्या निकालानुसार, आज महाराष्ट्रभरातील 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
LIVE

Background
Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: राज्यातील सर्व 288 नगरपरिषदा (Municipal Councils), नगरपंचायतींच्या निवडणुकीची (Nagar Panchayat Election Result 2025) मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेला. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार, आज महाराष्ट्रभरातील 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत (Nagarparishad Election Result) उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महत्त्वाचा निकाल दिलेला. काही नगरपरिषदांबाबत (Nagarparishad Election Result) न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यानं राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला पार पडली. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे, 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिलेले.
264 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला पार पडलेलं मतदान
राज्यातील 264 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान झालं होतं. तसेच, सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार, 24 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि 76 नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान घेतलं जाणार आहे. या सर्व ठिकाणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Beed Nagarparishad Election Results: बीडमध्ये उमेदवार प्रतिनिधींसमोर बीड मध्ये स्ट्राँग रूम अनलॉक
बीड ब्रेक: उमेदवार प्रतिनिधींसमोर बीड मध्ये स्ट्राँग रूम अनलॉक
बीड नगर परिषदेसाठी एक नगराध्यक्ष आणि 52 नगरसेवक पदासाठी होणार मत मोजणी
आधी टपाली मत मोजणी होणार
Parli Nagarparishad Election Results: परळीत स्ट्राँग रुम उघडली, मतमोजणी सुरु होणार
परळी येथील स्ट्राँग रूम ओपन केली जात आहे. काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल. पण त्याआधी स्ट्राँग रूम उघडण्याची प्रक्रिया सुरू आहे या ठिकाणी निवडणूक अधिकारी अरविंद लाटकर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आहेत.























