Jayant Patil : तर करा कारवाई! इस्लामपुरात एसटी चालवण्यावरून जयंत पाटलांची आक्रमक भूमिका
इस्लामपूर तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची एसटी बस चालवली होती. यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला.
Jayant Patil : इस्लामपूर तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची एसटी बस चालवली होती. यानंतर इस्लामपूर भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. बेकायदेशीर एसटी बस चालवल्याप्रकरणी जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा याबाबत भाजप नेत्यांनी इस्लामपूर पोलिसात तक्रार दिली आहे.
तर कारवाई करा, जयंत पाटील आक्रमक
यानंतर आता जयंत पाटील यांनीही आक्रमक भूमिका घेत चुकीचे असेल, तर कारवाई करा, असे आव्हान दिले आहे. एसटी चालवून देशाचा अमृतमहोत्सव साजरा करणे गुन्हा आहे का? माझ्याकडे लायसन्स आहे. चुकीचे असेल, तर सरकारने कारवाई करावी असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूरमध्ये बस चालविल्यावरून भाजपने गुन्हा दाखल करावा या मागणीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत आक्रमक भूमिका घेतली आहे.
एसटी चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना, किंवा जड वाहन चालक म्हणून आवश्यक असणाऱ्या परवाना किंवा, बॅच बिल्ला नसताना जड वाहन बेकायदेशीरित्या जयंत पाटील यांनी चालवलं असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
कोणताही अनुभव नसताना बेकायदेशीर बस चालविली
जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची सजवलेली बस शहरातून स्वत: चालविली. त्याचे व्हिडिओ व फोटो सर्वत्र व्हायरल झाले. मात्र, इस्लामपूर भाजपने यावर आक्षेप घेत जयंत पाटील यांनी स्वत: प्रसिध्दीसाठी व कोणताही अनुभव नसताना बेकायदेशीर बस चालविली असून त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्याकडे केली आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत असताना इस्लामपूर शहरातही नागरिकांची मोठी गर्दी होती. जयंत पाटील हे प्रसिध्दीसाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात, बस चालविण्याचा प्रयोग हा बेजबाबदारपणाचे लक्षण असून त्यांच्याकडे बस चालविण्याचा कोणताही अनुभव नाही, दुर्दैवाने काही घटना घडली असती, तर मोठे नुकसान झाले असते. पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता लोकशाहीचा सन्मान करत गुन्हा दाखल करावा अशी मागणी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Jayant Patil : जयंत पाटलांनी इस्लामपूर आगारात एसटी चालवली अन् भाजपची सटकली! थेट पोलिसांकडे तक्रार दाखल
- Sangli News : सांगलीत निर्धार फौंडेशनकडून सलग 75 तास स्वच्छता, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्तुत्य उपक्रम
- Sangli Crime : ब्रम्हनाळमध्ये कृष्णा काठी आढळलेल्या १४ फुटी मगरीचा मृत्यू, वनविभागाकडून अंत्यसंस्कार