Supriya Sule on Ladki Bahin Yojana : लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या, पंधराशे रुपयात नाती निर्माण होत नाहीत; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल
तासगाव तालुक्यातील सावळज गावचे सुपुत्र चंद्रकांत शिवाजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याचे अणावरण खासदार सुप्रिया सुळे यांच्या पार पडले. अनावरण सोहळ्यासाठी जयंत पाटील, खासदार विशाल पाटील उपस्थित होते.
![Supriya Sule on Ladki Bahin Yojana : लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या, पंधराशे रुपयात नाती निर्माण होत नाहीत; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल Supriya Sule attack on Mahayuti says ladki bahin yojana love after Lok Sabha result relationships are not formed for fifteen hundred rupees Supriya Sule on Ladki Bahin Yojana : लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या, पंधराशे रुपयात नाती निर्माण होत नाहीत; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/898b61365600417e0245fbff7b0a5a961726220846811736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर बहिणी लाडक्या झाल्या आहेत. पंधराशे रुपयांनी नाती निर्माण होत नाहीत. या नात्यावरून देखील महायुतीत श्रेयवाद होत असल्याची खोचक टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule on Ladki Bahin Yojana) यांनी केली. आपलं सरकार नक्की येणार असल्याचे सुद्धा सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बहिणीला काही नाही दिलं, तरी बहीण तुमच्यावर प्रेम असच करतात आणि दुर्दैव हे की या सरकारला लाडक्या बहिणीवरुनही श्रेयवाद सुरु आहे. जगातलं संस्कारांचं सगळ्यात पवित्र नातं हे बहिण भावाचं असत त्या पवित्र नात्यांमध्ये राजकारण सुरु आहे.
तासगाव तालुक्यातील सावळज गावचे सुपुत्र चंद्रकांत शिवाजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याचे अणावरण खासदार सुप्रिया सुळे यांच्या पार पडले. अनावरण सोहळ्यासाठी जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील सुहास बाबर आदी नेते उपस्थित होते.
रोहित पाटील यांच्याकडे नवीन चेहरा म्हणून पाहत आहोत
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तासगावमध्ये रोहित पाटील यांच्याकडे आपण नवीन चेहरा म्हणून पाहत आहोत. दरम्यान, स्वर्गीय आर आर पाटील यांच्या सुप्रिया सुळे यांनी आठवणी जागवल्या. सुप्रिया सुळे यांनी सांगितले की राज्यातील सर्वात मोठी पोलीस भरती आर आर पाटील यांच्या कार्यकाळामध्ये झाली. त्यामुळे आर आर आबा यांचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदलं जाईल. नेतृत्व संघर्षातून निर्माण होते असे सांगत त्यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या पक्षांतर्गत घडामोडींकडे लक्ष वेधले.
आम्हाला नवीन चिन्ह मिळेल की नाही याची सुद्धा खात्री नव्हती
त्या म्हणाल्या की, एक वर्षांपूर्वी पक्ष गेला आणि चिन्ह सुद्धा गेलं. आम्हाला नवीन चिन्ह मिळेल की नाही याची सुद्धा खात्री नव्हती. मात्र, पांडुरंगाने तुतारी चिन्ह आम्हाला दिलं असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. चिन्ह आज वाड्या-वस्त्यांवर पोहोचला असल्याचे त्यांनी नमूद केले. बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेनं निवडणूक हाती घेतली होती. त्यामुळे माझं श्रेय त्यांना असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही असे त्यांनी सांगतानाच आमची लढाई तत्त्वांसाठी लढाई सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. काही लोक आम्हाला विचारणा करत आहेत की चांगलं चिन्ह मिळालं आहे, तर न्यायालयी लढा कशासाठी देत आहात? मात्र ही तत्त्वांसाठी लढाई असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हा देश शक्तीच्या मन चालत नाही तर संविधानाने चालतो असेही त्यांनी यावेळी सांगितले. महा विकास आघाडीच्या राज्यातील 31 खासदारांनी दडपशाहीला विरोध करून निवडून आल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर त्यांनी खोचक टिप्पणी केली. खाण्या पिण्यावरून काय नसते, असे आर आरएसएसचे भागवत साहेब म्हणत आहेत. मला वाटले याचे विचार आपल्यासारखे होत आहेत, असेही त्या म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)