एक्स्प्लोर

Sangli News : स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली वाहत तरुणाची आत्महत्या, सांगलीतील येळवी गावातील घटना

Sangli News : सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील येळवी येथे 22 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर स्वतःचा फोटो टाकत भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत शेतातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Sangli News : सांगली (Sangli) जिल्ह्याच्या जत (Jat) तालुक्यातील येळवी येथे 22 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर (Social Media) स्वतःचा फोटो टाकत भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत शेतातील घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. येळवी येथील 22 वर्षीय औदुंबर विजय जगताप याचे घर येळवी गावापासून काही अंतरावर आहे. शुक्रवारी (14 एप्रिल) दुपारी तीन वाजता औदुंबर जगताप याने स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटलला (WhatsApp Status) स्वतःचा फोटो ठेवला. स्टेटस ठेवल्यानंतर काही वेळानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

औदुंबर विजय जगताप याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. जत पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्येची माहिती मिळताच जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता. 

सांगलीत तळीरामाचा घरगुती कारणातून शोले स्टाईल आत्महत्याचा ड्रामा

सांगलीच्या विश्रामबाग या ठिकाणी रात्री एका तळीरामाने अपार्टमेंवर चढून शोले स्टाईल आत्महत्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. एका चार मजली अपार्टमेंटवर चढून आत्महत्येच्या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. सुनील प्रजापती असे या मद्यपी व्यक्तीचं नाव आहे. घरगुती भांडणाच्या रागातून दारु पिऊन त्याने थेट इमारतीच्या कठड्यावर जाऊन हा धिंगाणा सुरु केला. या घटनेचे गांभीर्य ओळखून सांगली महापालिकेचे अग्निशमन दल देखील घटनास्थळी दाखल झाले .सुमारे पाऊण तास या ठिकाणी तळीराम सुनील प्रजापतीचा हा शोले स्टाईल आत्महत्याचा ड्रामा सुरु होता. अखेर पोलीसानी  गनिमी काव्याने मागून पोहचत काठड्यावर थांबलेल्या सुनील प्रजापतीला धाडसाने पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला. पोलीस प्रशासनाकडून मदधुंद सुनील प्रजापतीची समजूत काढण्याचा प्रयत्न सुमारे पाऊण तास सुरू होता..सुनील प्रजापती  हा याच इमारतीमध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या महिलेचा जावई असून त्याची पत्नी आणि तो या ठिकाणी राहतात. घरगुती वादानंतर दारु पिऊन त्यांनी हा आत्महत्याचा ड्रामा केला असल्याचे समोर आले आहे.

एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणातून खून

सांगली शहरामध्ये सिनेस्टाईल पाठलाग करत महाविद्यालयीन तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी (13 एप्रिल) सायंकाळी घडली. भर रहदारीच्या ठिकाणी थरारक पद्धतीने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या खून प्रकरणी संजय नगर पोलिसांनी चार तरुणांना अटक केली. केवळ एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणातून एका तरुणाचा तीन तरुणांनी खून केला. माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ही खळबळ जनक घटना घडली. राजवर्धन राम पाटील, वय 18 वर्षे असे या मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो वसंतदादा औद्योगिक परिसरातील शासकीय आयटीआयमध्ये शिकत होता. 

हेही वाचा

पोलिस निरीक्षकासोबत वाद, अपमानित झाल्याच्या भावनेतून आत्महत्येचं स्टेटस ठेऊन कर्मचारी गायब 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget