एक्स्प्लोर

Sangli Crime : नागज फाट्यावर तब्बल 1 कोटी 17 लाखांचा गुटखा पकडला; दोन कंटेनर जप्त, तिघांच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागज फाट्यावर कर्नाटकातील अथणी सातारा मार्गे पुण्याकडे गुटख्याचे दोन कंटेनर जात होते. हे कंटेनर नागज फाट्यावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचला.

Sangli Crime : सांगलीमधील कवठेमहांकाळ पोलिस आणि सांगलीच्या (Sangli News) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (Sangli Police) नागज फाट्यावर तब्बल 1 कोटी 17 लाखांचा गुटखा पकडला. पोलिसांनी यावेळी दोन कंटेनरसह सुगंधी तंबाखू आणि सुपारी असा एकूण एक कोटी 37 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी दत्तात्रय कोळी यांच्या समक्ष गुटख्याचा पंचनामा करण्यात आला.

सांगली जिल्ह्यातील रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांना खबऱ्या मार्फत या मार्गावरून गुटख्याचा कंटेनर जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, यांच्यासह सांगली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पोलिस पथकाने सापळा रचला. विजापूर येथून जतमार्गे या महामार्गावर दोन कंटेनर जात असताना सापळा रचलेल्या पथकातील सर्वांनी कंटेनर अडवले. पोलिसी खाक्या दाखवताच यामध्ये एका कंपनीचा गुटखा आहे तो पुण्याकडे वाहतूक करत असल्याचे संशयित आरोपींनी सांगितले. 

कंटेनरसह तिघेजण ताब्यात

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागज फाट्यावर कर्नाटकातील अथणी सातारा मार्गे पुण्याकडे गुटख्याचे दोन कंटेनर जात होते. हे कंटेनर नागज फाट्यावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचला. कंटेनर फाट्यावर आल्यानंतर त्या दोन कंटेनरची अडवून पाहणी करण्यात आली. तेव्हा दोन्ही वाहनांमध्ये गुटखा असल्याचे लक्षात आले. यावेळी पोलिसांनी दोन्ही कंटेनरसह तिघांना ताब्यात घेतले. कंटेनरमधील तिपुरय्या संगप्पा बमनोळी, बसवेश्वर टोपण्णा कटीमणी (दोघेही रा. करजगी, ता. जत) श्रीशैल्य तमराया हाळके (रा. उमदी, सुसलाद रस्ता ता. जत) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

कवठेमहांकाळ पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई

ही कारवाई राज्यातील एक मोठी कारवाई असून कवठेमहांकाळ पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी सांगितले. कवठेमहांकाळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक प्रशांत जितेंद्र जाधव, संजय पाटील, दीपक गायकवाड, नागेश खरात, संदीप नलावडे, विनायक सुतार, ऋतुराज  होळकर आदींनी कारवाई केली. 

मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा तडाखा लावला आहे. अनेक ठिकाणांवर कारवाई केली.अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्टWalmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्सWalmik Karad Mother : वाल्मीक कराडच्या आईची तब्येत बिघडली,रुग्णालयात दाखल करायला सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Embed widget