Sangli Crime : वाढदिवसादिवशी आईने नवा मोबाईल घेऊन दिला नाही, मिरजमधील 15 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं
Sangli Crime : आईने वाढदिवसादिवशी नवा मोबाईल घेऊन दिला नसल्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केली आहे.
Sangli Crime : वाढदिवसादिवशी आईने नवीन मोबाइल घेऊन दिला नाही, या किरकोळ कारणावरून मिरज (Sangli Crime) मधील एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या (Suicide Case) केल्याची धक्कादायक घटना घडलीय. विश्वजित रमेश चंदनवाले असे विद्यार्थ्याचे नाव आहे. आईने मोबाईल घेऊन देण्याचा हट्ट पूर्ण न केल्याने त्याने टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवलंय. विश्वजित हा एकुलता एक असल्याने चंदनवाले कुटुंबियांवर मोठा आघात झाला. मिरज शहर पोलीसांनी विश्वजितच्या या आत्महत्त्येची (Sangli Crime) नोंद करत तपास सुरू केलाय.
दरम्यान, विश्वजीतच्या आत्महत्येनंतर (Suicide Case) सायकॉलॉजिकल वेलफेयर असोसिएशनने अठरा वर्षाच्या आतील मुलांच्या मोबाईल आणि इंटरनेट वापरावर राज्य शासनाने बंदी घालण्याची मागणी केली आहे.
विश्वजित हा एकुलता एक असल्याने चंदनवाले कुटुंबियांवर मोठा आघात
रिल्स, सोशल मिडिया वर अपडेटच्या खुळापायी आज मोबाईलचा नाद थोरा पासून ते मोठ्या लोकांपर्यंत कसा लागलाय आणि मोबाईल वापराचा कसा अतिरेक होतोय. हे ही हे आपण पाहतोय. मात्र याच मोबाईलच्या नादात अल्पवयीन मुले आपला जीव देखील देत असतील तर हे मोबाईलचे वेड किती वाईट आहे याची कल्पना येते. मात्र मिरजेतील नववीत शिकणारा विश्वजितने आपल्याला नवीन मोबाईल मिळाला नाही म्हणून थेट आत्महत्याचे पाऊल उचलले आहे.
अठरा वर्षाच्या आतील मुलांना मोबाईल आणि इंटरनेट वापरावर राज्य शासनाने बंदी घालावी
मानसोपचार तज्ज्ञांनी अल्पवयीन मुलांच्या अशा पद्धतीच्या आत्महत्या बाबत फार गांभीर्याने यांना बघणे गरजेचे आहे ,असे मत व्यक्त करण्यात येतेय. शाळा कॉलेजमध्ये मुलांच्या मध्ये चालणाऱ्या रिल्स आणि सोशल मीडिया वरील अपडेट वर ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी मुलं आपण या चर्चेतून मागे पडतो का? अशी त्यांच्या मनामध्ये भीती उपस्थित होत असते अशा मधूनच आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल ही मुलं उचलताना दिसून येतात. त्यामुळे अठरा वर्षाच्या आतील मुलांना मोबाईल आणि इंटरनेट वापरावर राज्य शासनाने बंदी घालावी, अशी मागणी देखील करण्यात येतेय.
View this post on Instagram
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळhttps://t.co/s3x6F9wkRy
— ABP माझा (@abpmajhatv) December 22, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या