(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : खानापूर गावचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग भगत शहीद; उद्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
Sangli News : सांगली जिल्ह्यातील खानापूर गावचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत लेह लडाखमध्ये शहीद झाले. या घटनेनंतर खानापूर तालुक्यासह सांगली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
Sangli News : सांगली जिल्ह्यातील खानापूर गावचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत (Naib Subhedar Jai Singh Bhagat) लेह लडाखमध्ये शहीद झाले. या घटनेनंतर खानापूर तालुक्यासह सांगली जिल्ह्यात (Sangli News) शोककळा पसरली आहे. लेह लडाखमध्ये हिमस्खलनाच्या घटनेत जयसिंग भगत शहीद झाले. जयसिंग भगत हे सुभेदार 22 मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये कार्यरत होते. उद्या खानापूर या मूळ गावी जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. या घटनेने संपूर्ण तालुक्यासह जिल्हा हळहळ व्यक्त करत आहे. सर्वत्र भगत यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत यांचे पार्थिव उद्या (ता. 21) सकाळी लष्कराच्या विशेष विमानाने पुण्यात आणण्यात येईल. तेथून त्यांचे पार्थिव खानापूर येथे आणण्यात येईल. खानापूर ते गोरेवाडी मार्गावरील भगतमळा परिसरातील मातोश्री मंगल कार्यालयसमोरील पटांगणावर शहीद भगत जयसिंग भगत यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या