Sangli News : सांगली जिल्ह्यात देशातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत; धावणार बैलगाडी, पण विजेत्याला 'थार' गाडी!
सगळ्यात मोठं बक्षीस असल्याने या बैलगाडी शर्यतीमध्ये सुमारे 200 हून अधिक बैलगाडी शर्यत चालक सहभागी होतील, असा अंदाज डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Sangli News : देशातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत 9 एप्रिल रोजी विटाजवळील भाळवणीमध्ये होणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार (दादा) पाटील युथ फौंडेशन वर्धापनदिनानिमित्त ही सर्वात मोठी 'रुस्तम-ए-हिंद' बैलगाडी शर्यत सन 2023/24 असे या स्पर्धेला नाव देण्यात आलं आहे. या बैलगाडी शर्यतीसाठी आतापर्यंत शर्यतीसाठी कधीही न देण्यात आलेली भव्य अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या बक्षिसाचा लॉन्चिंग कार्यक्रम आज विटाजवळील राष्ट्रकुल कुस्ती आखाडा विटा येथे पार पडला.
पहिला क्रमांकाच्या विजेत्यास 19 लाखांची नवी कोरी महिंद्रा थार गाडी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ट्रॅक्टर आणि इतर विजेत्यांना दुचाकी गाड्या देण्यात येणार आहेत. बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी बक्षीस असल्याने या बैलगाडी शर्यतीमध्ये सुमारे 200 हून अधिक बैलगाडी शर्यत चालक सहभागी होतील, असा अंदाज डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला आहे. या शर्यतीच्या निमित्ताने रक्तदानाचा सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आला आहे.
सहा जणांनी रक्त रक्तदान करावं
दरम्यान, स्पर्धेसाठी एका बैलगाडीच्या नोंदणीबरोबर सहा जणांनी रक्त रक्तदान करावं, असा निर्णय घेण्यात आला आहे. प्रेक्षकांचा सारासार विचार करून पट्ट्याच्या दोन्ही बाजूने साईडला प्रेक्षक गॅलरी उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निकालामध्ये कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरासह भव्य स्क्रीनही लावण्यात येणार आहे. याचबरोबर लाईट व्यवस्थाही करण्यात येणार आहे. भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा असल्याने पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून महिंद्रा थार कार, चषक आणि एक किलो गुलाल असे बक्षीस बक्षीसाचे स्वरूप असेल.दुसऱ्या क्रमांकाला ट्रॅक्टर, चषक आणि गुलाल तर तिसऱ्या क्रमांकाला ट्रॅक्टर, चषक आणि गुलाल तर अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाला टू व्हीलर गाडी असं बक्षीस ठेवण्यात आलं आहे. सेमी फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या बैलगाड्यांनाही टू व्हीलर बक्षीस ठेवण्यात आलं आहे.
याबरोबरच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना सुद्धा टी-शर्ट टोपी याबरोबर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक बैलगाडीला एक चषक देण्यात येणार आहे. ही बैलगाडी शर्यती देशातील सर्वांसाठी खुली आहे. त्यामुळे यामध्ये कोणत्याही जिल्ह्यातील, प्रांतातील लोक सहभागी होऊ शकतात अशी माहिती देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या