(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : जमीन जबरदस्तीने हडप करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी दखल घेतली नाही, इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या दारातच नणंद-भावजयीचा आत्मदहनाचा प्रयत्न
वाळवा तालुक्यातील कापुसखेड रस्त्यावरील जमीन जबरदस्तीने हडप करण्याच्या प्रकरणात तक्रार देण्यात गेल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली नाही म्हणून दोघी नणंद-भावजयीचा पोलिस स्टेशनमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला.
Sangli News : जमीन जबरदस्तीने हडप करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप करत दोन महिलांनी सांगलीमधील इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या (Islampur) दारातच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. वाळवा तालुक्यातील कापुसखेड रस्त्यावरील जमीन जबरदस्तीने हडप करण्याच्या प्रकरणात तक्रार देण्यात गेल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली नाही म्हणून दोघी नणंद-भावजयीचा पोलिस स्टेशनमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने पुढील अनर्थ टळला.
या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुजा ऋतुराज धुमाळे व आरती प्रवीण धुमाळे अशी या दोघींची नावे आहेत. धुमाळे कुटुंबाचे कापूसखेड रस्त्यावर शेत आहे. सध्या या परिसरात प्लॉट पाडून जमीन खरेदी- विक्रीचे व्यवहार जोमात होत आहेत. अनेक बड्या राजकीय कार्यकर्त्यांनी या परिसरात आपली मालमत्ता केली आहे. धुमाळे कुटुंबाच्या या जागेलगत असणाऱ्या एका बड्या कार्यकत्याने त्यांच्या 109 गुंठे जागेला कुंपण मारण्यासाठी खांब रोवण्यास सुरुवात केली होती.
त्यामुळे हतबल झालेल्या या कुटुंबाने पोलिसात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी माहिती अथवा त्यांची फिर्याद घेण्यास टाळाटाळ चालविली होती. त्यामुळे संतापलेल्या आरती आणि पूजा या दोघींनी पोलिस ठाण्याच्या दारातच आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या दोघींना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.
लेकीने आईला वाचवण्यासाठी कोल्ह्याचा आवळला गळा!
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कोगनोळी येथील आटपाडकर वस्ती येथील महिलेवर पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये सुरेखा लिंगाप्पा चौरे ही महिला जखमी झाली. मात्र, यावेळी मुलगी कविताने अत्यंत धाडसाने दोन्ही हाताने कोल्ह्याचा गळाच आवळून धरला. त्यावेळी आईने कोल्ह्याच्या तोंडातील बोट काढून घेतले व बाजूला पडलेले दगड व काठी घेऊन कोल्ह्यावर उगारली. त्याचवेळी मुलीने कोल्ह्याचा आवळलेला गळा सोडून दिला. आईने उगारलेली काठी व लेकीचे रौद्र रूप पाहून कोल्हा पळून गेला. या भयानक हल्ल्यावेळी तिथे असलेल्या कविताने थेट पिसाळलेल्या कोल्ह्याचा गळाच आवळून धरून केलेले धाडस यामुळे त्या कविताच्या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे. दुसरीकडे, पिसाळलेल्या कोल्ह्याचा मानवी वस्तीत वावर आणि महिलेवर हल्ला यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या