(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ram Naik : राज्यपालांवर महाविकास आघाडी कशी काय आरोप करते? माजी राज्यपाल राम नाईकांचा सवाल
Ram Naik : पुन्हा एकदा निवडणुका घ्या असं म्हणणारी महाविकास आघाडी विधानसभेचा अध्यक्ष निवडू शकत नव्हती आणि राज्यपालांवर महाविकास आघाडी कशी काय आरोप करते? असा सवाल माजी राज्यपाल राम नाईक यांनी केला आहे.
Ram Naik : आता पुन्हा एकदा निवडणुका घ्या असं म्हणणाऱ्या महाविकास आघाडीने विधानसभेचा अध्यक्ष तुम्ही निवडू शकत नव्हता आणि राज्यपालांवर महाविकास आघाडी कशी काय आरोप करते? असा सवाल माजी राज्यपाल राम नाईक यांनी केला आहे. केवळ आपल्याला मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी शिवसेनेच्या नावावर अनैतिक निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आटपाडीमध्ये दोनदिवसीय शंकरराव खरात जन्मशताब्दी संमेलन पार पडले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राम नाईक यांनी विविध मुद्यांवर भाष्य करताना महाविकास आघाडीमधील नेत्यांवर टीका केली. औरंगाबाद नामांतर मुद्यावरूनही त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला.
औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर केले जाणार याची आम्हाला पूर्व कल्पना नव्हती असे म्हणणे शरद पवारांना (Sharad pawar) शोभणारं नाही, असे सांगत त्यांनी जोरदार टीका केली. कॅबिनेटच्या निर्णयाची पूर्वसूचना शरद पवार यांना कोणत्याही कारणाने देण्याची गरज नाही, पण त्यावेळी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी त्या निर्णयाला विरोध करायला हवा होता. महाविकास आघाडीला मार्गदर्शन करणारे म्हणून शरद पवार यांचे नाव घेतले जात होते. मग मार्गदर्शन करणाऱ्याला हे सारे निर्णय घेतले जाणार हे माहीत नव्हते म्हणणे म्हणजे पवार महाविकास आघाडी सरकारला योग्य मार्गदर्शन करत नव्हते असा टोला राम नाईक यांनी शरद पवार यांना लगावला.
उद्धव ठाकरे, संजय राऊत निशाण्यावर
महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची इतकी घुसमट होत होती की, त्यांना औरंगाबादचे संभाजीनगर करता आले नाही. सरकार कोसळणार आणि राजीनामा देण्याच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर केलं, हा निर्णय असा घेता येत नाही. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची घुसमट झाल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसेनेच्या नेत्यांचा उद्रेक एका दिवसातील नव्हता. संजय राऊत यांची बोलण्याची भाषा म्हणजे स्वतःला आणि दुसऱ्याला खड्यात घालणे अशी होती. संजय राऊत यांनी बोलताना हीन दर्जाची भाषा वापरली असेही नाईक म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या