एक्स्प्लोर

Ajit Pawar on Love Jihad : लव जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचं काम, राजकीय पोळी भाजण्यासाठी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; अजित पवारांचा हल्लाबोल   

राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे, त्याविरोधात ज्या प्रमाणात उठाव व्हायला पाहिजे होता, तसा तो होताना दिसत नसल्याची खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली. 

Ajit Pawar on Love Jihad : लव जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याच काम सुरू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे, मात्र आज जे समाजात सुरू आहे त्याविरोधात ज्या प्रमाणात उठाव व्हायला पाहिजे होता, तसा तो होताना दिसत नसल्याची खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी (Ajit Pawar on Love Jihad) व्यक्त केली. 

सांगली जिल्ह्यातील कासेगावमध्ये क्रांती वीरांगणा इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अजित पवार बोलत होते. कासेगाव येथील क्रांतीवीरांगणा इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकासाठी दोन विधानपरिषद सदस्यांच्या निधीतून एकूण 22 लाख आणि सीएसआरमधून 5 लाख निधी देण्याचे अजित पवार यांनी जाहीर केलं. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या आमदार निधीतून 11 लाख, आमदार जयंत पाटील, सातारचे शशिकांत शिंदे यांच्या आमदार निधीतून 11 लाख रुपये आणि सीएसआरमधून 5 लाख रुपये जाहीर असे एकूण 27 लाख जाहीर करण्यात आले.

अजित पवार म्हणाले, क्रांती वीरांगणा इंदूमती पाटणकर यांनी स्वातंत्रलढ्याबरोबर जाती अंताचा लढा उभा केला. त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह लावून दिले. आता सुद्धा याच भूमीतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दोन्ही मुलांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अलीकडे सेक्युलर या शब्दाला (Ajit Pawar on Love Jihad) कुठं तरी तिलांजली देण्याचा प्रयत्न काही जण करतात. हे आपल्या भारताच्या दृष्टीने अतिशय अडचणीचं होणार आहे."

शपथविधीवर भाष्य टाळले 

दरम्यान, अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर बोलणे टाळले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य पडदा टाकला आहे. सारखं सारखं ते उगाळू नका. त्याला तीन वर्षे झालेली आहेत. त्यापेक्षा आपण महागाई, बेरोजगारी आत्ताचे जे काही यक्ष प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याबद्दल या मीडियाचाही वापर करून लोकांना जागृत करू, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर करावा. कुणाच्याही धर्माने एखाद्या धर्माबद्दल आकस बाळगावा असं सांगितलेलं नाही. आपल्या धर्माची प्रार्थना आपापल्या धर्म मंदिरात करावी, घरात करावी. मात्र, बाहेर वावरताना प्रत्येकानं नागरिक या नात्याने वावरावं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Baba Siddique vs Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines at 11AM 28 January 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्सMohit Kamboj On Baba Siddique : सिद्दीकींच्या डायरीमध्ये कंबोज यांचं नाव? कंबोज स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines at 10AM 28 January 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्सEknath Shinde Thane : 55 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंचं भाषण, ठाकरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Baba Siddique vs Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....
बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव अन् WhatsApp चॅटिंग; आरोप होताच मोहित कंबोजांचं तातडीने स्पष्टीकरण, म्हणाले...
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Embed widget