एक्स्प्लोर

Sangli Crime : सांगली जिल्ह्यात दुधात भेसळीचा महापूर; अन्न व औषध प्रशासन मात्र थातूरमातूर कारवाई करण्यात मग्न

सांगली जिल्ह्यात दुधात भेसळ करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे. मात्र, याकडे अन्न व औषध प्रशासन पुरते दुर्लक्ष करत आहे. भेसळ होत असलेल्या ठिकाणी जाऊन थातूरमातूर कारवाई करण्याचे सोपस्कार पार पाडले जातात.

Sangli Crime : सांगली जिल्ह्यात दुधात भेसळ करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे. मात्र, याकडे अन्न व औषध प्रशासन पुरते दुर्लक्ष करत असून तक्रार आली तर भेसळ होत असलेल्या ठिकाणी जाऊन थातूरमातूर कारवाई करण्याचे फक्त सोपस्कार पार पाडले जातात. आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे काल अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत दुध भेसळ अड्ड्यावर छापा टाकला. दूध भेसळ सोल्यूशन, रिफाइंड खोबरेल तेल व डेअरी पर्मिट पावडर तसेच भेसळयुक्त गाय व म्हशीचे दूध असा एकूण एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला असून तो ताब्यात घेतला गेला. 

मात्र, बनपुरीत झालेली कारवाई ही दूध व्यवसायातील भेसळ करणाऱ्या छोट्या केंद्रावर कारवाई झाली आहे. मात्र, दुधात भेसळ करणाऱ्या अनेक मोठ्या केंद्राकडे अन्न व औषध प्रशासन का दुर्लक्ष करत आहे? तिकडे का कारवाई करून भेसळ धंदा बंद होत नाही? असा सवाल नागरिक करत आहेत.

आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील दुध सेंटर चालक संजय पडळकर हा दुधात भेसळ करून भेसळयुक्त दूध एका मोठ्या केंद्राला पाठवत होता. याशिवाय दुधाची विक्री मोठ्या प्रमाणात करत असल्याची असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने बनपुरी येथील संजय पडळकरच्या दुध सेंटरवर छापा मारला. यावेळी अन्न व औषध प्रशासनाला दुधामध्ये भेसळ करण्यासाठी दूध भेसळ सोल्यूशन, रिफाइंड खोबरेल तेल व डेअरी पर्मीट पावडर तसेच भेसळयुक्त गाय व म्हशीचे दुध असा एकूण एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. 

दरम्यान सदर भेसळ दूध सापडलेले साहित्य हस्तगत करण्यात आलं आहे. सदरची कारवाई ही अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मसारे यांच्यासह मेघना पवार व चन्नवीर स्वामी यांनी केली. या कारवाईमुळे आटपाडी तालुक्यात दुधामध्ये भेसळ होत असल्याचे सिध्द झाले आहे. दरम्यान, या कारवाईने आटपाडी तालुक्यातील दुधामध्ये भेसळ करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. 

फक्त कारवाई, गुन्हा का दाखल नाही?

दुधात भेसळ करणाऱ्या व्यक्तीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जातो. बनपुरीत अन्न व औषध प्रशासनाने दूध भेसळ अड्डयावर छापा टाकून कारवाई केली. मात्र, अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कारभाराबाबत चर्चा सुरू आहे. आटपाडी तालुक्यात बनपुरीशिवाय इतर ठिकाणीही भेसळीचे अड्डे चालू आहेत. त्याचा सातबारा अन्न व औषध प्रशासनाकडे असून त्यांच्यावर कारवाईची प्रतीक्षा आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Embed widget