एक्स्प्लोर
जपान ओपन सीरीजमध्ये सायना नेहवालची विजयी सलामी
या स्पर्धेत सायनासह भारताच्या श्रीकांत किदम्बी, एच. एस प्रणॉय, समीर वर्मा यांनी आपापले सलामीचे सामने जिंकले.
टोकियो : भारताची बॅटमिंटनपटू सायना नेहवालनं टोकियोत सुरू झालेल्या जपान ओपन सुपर सीरीज बॅडमिंटनमध्ये विजयी सलामी दिली. लंडन ऑलिम्पिकच्या कांस्यविजेत्या सायनानं सलामीच्या सामन्यात थायलंडच्या पर्णपवी चोचुवॉन्गचा २१-१७, २१-९ असा अवघ्या ३९ मिनिटांत धुव्वा उडवला.
सायनानं मांडीच्या दुखापतीमुळं नुकत्याच झालेल्या कोरिया सुपर सीरीजमधून माघार घेतली होती. पण जपान ओपनच्या सलामीच्या सामन्यात ती सहजतेनं खेळताना दिसली.
आता दुसऱ्या फेरीत सायना नेहवालसमोर स्पेनच्या कॅरोलिना मरिनचं आव्हान आहे. त्या दोघींमध्ये आजवर झालेल्या सातपैकी चार सामन्यांमध्ये सायनानं विजय मिळवला आहे, तर कॅरोलिना उभयतांमधील तीन सामने जिंकले आहेत.
दरम्यान, या स्पर्धेत सायनासह भारताच्या श्रीकांत किदम्बी, एच. एस प्रणॉय, समीर वर्मा यांनी आपापले सलामीचे सामने जिंकले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement