Silver Pomfret : पापलेटला राज्य मासा म्हणून दर्जा, सिल्वर पॉम्फ्रेटच्या संवर्धनाला चालना मिळण्याची आशा
रत्नागिरी : अनेकांच्या आवडीच्या पापलेट माशाला म्हणजेच सिल्वर पॉम्फ्रेटला राज्य माशाचा दर्जा देण्यात आला आहे.
रत्नागिरी : पापलेटला (Silver Pomfrets) राज्य माशाचा दर्जा देण्यात आला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईतील मत्स्यपालन, पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत घोषणा केली. त्यामुळे आता त्याच्या संवर्धनासाठी योजना तयार करणे, त्या आखणे आता आणखी शक्य होणार आहे. दरम्यान, सिल्वर पापलेटचं महत्त्व, राज्य मासा (State Fish) म्हणून दर्जा दिल्याने होणारे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया.
ताज्या माशांच्या आठवणीमुळे किंवा ते मासे पाहिल्यानंतर मत्स्यप्रेमीच्या जीभेला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. त्यात पापलेट म्हटल्यानंतर तर अनेकांच्या हा मासा आवडीचा. पण, त्याच पापलेट माशाला म्हणजेच सिल्वर पॉम्फ्रेटला राज्य माशाचा दर्जा देण्यात आला आहे. कोकणातील हर्णे ते पालघर या दरम्यानच्या समुद्रीपट्ट्यात सिल्वर पॉम्फ्रेटला मोठ्या प्रमाणात सापडतात. चवीला उत्तम असलेले या पापलेटची निर्यात देखील मोठ्या प्रमाणात होते. शिवाय, मागणी मोठी असली तरी स्थानिक बाजारात देखील सिल्वर पॉम्फ्रेटला मोठी मागणी असते.
अभ्यासक सिल्वर पॉम्फ्रेटच्या संवर्धनाबाबत आशावादी
वातावरणासह मासेमारी (Fishing) पद्धतीत झालेल्या बदलामुळे साधारणपणे 1980 पासून सिल्वर पापलेट कमी प्रमाणात सापडत असल्याच्या नोंदी आहेत. दरम्यान, लहान पापलेट मासे देखील मोठ्या प्रमाणात पकडण्याचे प्रमाण सध्या वाढलेले दिसून येते. पापलेटचे सरासरी वार्षिक उत्पादन 1962 ते 1976 दरम्यान 8312 टन, 1991 ते 2000 दरम्यान 6592 टन, 2001 ते 2012 दरम्यान 4445 टन तर 2010 ते 2018 या काळात 4154 टन नोंदवण्यात आले आहे. पण, सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सिल्वर पापलेटच्या संवर्धनाबाबत सध्या अभ्यासक देखील आशावादी झालेले दिसून येत आहेत.
बाजारात मोठी मागणी, आर्थिक उलाढालही मोठी
कोकण किनारपट्टीचा विचार केल्यास हर्णे ते पालघर या दरम्यान हा मासा मोठ्या प्रमाणात सापडतो. ताजा असलेला हा मासा काहीसा सफेद किंवा सिल्वर दिसतो. शिवाय, आकाराने मोठं असलेलं पापलेट हे लहान पापलेटपेक्षा चवीला देखील उत्तम असते. त्यामुळे त्याला बाजारात मोठी मागणी असून त्यातून आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे बाजारात या माशाला मोठी मागणी दिसून येते. या सिल्वर पापलेटच्या जमेच्या बाजू आहेत. सध्या लहान आकाराचे सिल्वर पापलेट पकडण्याचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सिल्वर पापलेटच्या संवर्धनाला चालना मिळेल अशी आशा करायला काहीच हरकत नाही.
हेही वाचा