एक्स्प्लोर

Sai Resort Dapoli : दापोलीचे साई रिसॉर्ट पाडून टाका, खेड जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश

Anil Parab Sai Resort Demolition: साई रिसॉर्ट हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या मालकीचे असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. 

रत्नागिरी: दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट  (Sai Resort Dapoli) पाडण्याचे आदेश खेडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत. साई रिसॉर्टची मालकी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्याकडे असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. तसेच हे रिसॉर्ट सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आलं असल्याचा दावा करत इडीने त्यावर जप्तीची कारवाई केली होती. 

या आधी मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीकडून साई रिसॉर्टवर तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्यात आली होती. सीरआरझेड कायद्याचे उल्लंघन करून या रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप आहे. रिसॉर्टच्या बांधकामासाठी मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय ईडीला आहे. ईडीने हायकोर्टात या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

ईडीने जवळपास 10.20 कोटी रुपये किंमतीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. यामध्ये 2 कोटी 73 लाख 91 हजार रुपये किमतीची जवळपास 42 गुंठे जमीन आणि 7 कोटी 46 लाख 47 हजार रुपये किमतीचे रिसॉर्ट याचा समावेश होता. 

साई रिसॉर्टचे बांधकाम हे CRZ कायद्याचं उल्लंघन करून करण्यात आले असून यात मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. मागील जवळपास दीड-दोन वर्षांपासून ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. या प्रकरणी सोमय्या यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. हे रिसॉर्ट अनिल परब यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तर अनिल परब यांनी आरोप फेटाळून लावताना आपला या साई रिसॉर्टशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. 

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या मालकीचं हे साई रिसॉर्ट आहे. या प्रकरणी अनिल परब यांना तूर्तास हायकोर्टाकडून अटकेपासून संरक्षण आहे. तर, सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे. 

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात आहे तरी काय?

साई रिसॉर्ट प्रकरणाी जयराम देशपांडे व  सदानंद कदम यांना ईडीनं अटक केली आहे. देशपांडे आणि कदम यांच्यासह सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावांचाही आरोपपत्रात समावेश आहे या प्रकरणात तपास अद्यापही सुरू असून भविष्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची ईडीला मुभा आहे. या आरोपपत्रात सध्या 6 आरोपींविरोधात आरोप आहे. विशेष म्हणजे अनिल परब यांच्या विरोधात कोणताही आरोप नाही. मात्र या प्रकरणाचे सूत्रधार अनिल परब असल्याचे ईडीने म्हटले आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget