एक्स्प्लोर

Shivsena : गजाभाऊंचं आता वय झालंय, सिद्धेश कदम लोकसभेला राहतील; गजानन कीर्तीकरांच्या मतदारसंघावर रामदास कदमांचा दावा

Ramdas Kadam : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिद्धेश कदम यांची चर्चा झाली असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली. 

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचे रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आपला दावा सांगितला आहे. खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांचं आता वय झालं आहे, जर ते निवडणुकीला उभे राहणार नसतील तर  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे ( Mumbai North West Lok Sabha Election) उमेदवार हे सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) असतील असं महत्त्वपूर्ण वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदम  यांनी केलंय. त्या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिद्धेश कदम यांची चर्चा झाली असेल अशीही शक्यता त्यांनी वर्तवली. रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर आता या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार कोण असेल याची चर्चा मात्र सुरू झाली.

खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदेंच्या शिवसेनेत असून त्याचे पुत्र अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) हे ठाकरे गटात (Shiv Sena Thackeray) आहेत. ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांचे नाव अंतिम झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची चर्चा सुरू आहे. या मतदारसंघात सिद्धेश कदम यांचे फ्लेक्सही झळकताना दिसत आहेत. 

काय म्हणाले रामदास कदम? 

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान  खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) हेच पुन्हा उभे राहतील, कदाचित या लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिद्धेश कदम त्यांची काही चर्चा झाली असेल असे सांगत खासदार गजाभाऊ कीर्तीकर यांचे आता वय झाले आहे ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात कदाचित गजाभाऊ कीर्तिकर उभे राहिले नाहीत तर या ठिकाणी सिद्धेश कदम उमेदवारी मागतील असं मोठे वक्तव्य शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली दौऱ्यावर असताना केल आहे.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ

मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात सध्या गजानान कीर्तीकर हे खासदार आहेत. गजानन कीर्तीकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. गजानन कीर्तीकर यांचं या मतदारसंघावर वर्चस्व आहे. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत आणि 2019  मध्ये संजय निरुपम यांचा यांचा पराभव केला होता. 

गजानन कीर्तीकर हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे होते. त्यांनी बाळासाहेबांच्य खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. मुंबईतील शिवसेनेच्या वाढीसाठी कीर्तीकरांनी झोकून देऊन काम केलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कीर्तीकर कुणाला साथ देणार याची उत्सुकता होती. त्यांनी मागील दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. 

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. सहापैकी तीन भाजप आणि तीन ठाकरे गट असे आमदार या मतदारसंघात आहेत. मात्र खासदार असलेले गजानन किर्तीकर हे शिंदे गटात आहेत.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Embed widget