Raj Thackeray : उद्या मुंबईला हात घालतीत, विदर्भाचा तुकडा पाडतील; मनसेच्या शिबीरातून राज ठाकरेंचा घणाघात
Raj Thackeray : आपण अटकेपार झेंडा फडकवले आहेत. तिथपर्यंत मराठा साम्राज्य गेले होते. आपण इतिहास विसरलो आहोत. मोबाईल , टेलिव्हिजन मध्ये बिझी आहोत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray : ज्याप्रकारची न्यायव्यवस्था सध्या आहे. ते पाहता राज्यकर्ते उद्या मुंबईला हात घालतील, विदर्भाचा तुकडा पाडतील. कारण आपण संपूर्ण प्रदेशावर राज्य केलय. त्यामुळेच यांचा आपल्या प्रदेशावर डोळा आहे. गेली ७० वर्ष हे सुरू आहे. आपण अटकेपार झेंडा फडकवले आहेत. तिथपर्यंत मराठा साम्राज्य गेले होते. आपण इतिहास विसरलो आहोत. मोबाईल , टेलिव्हिजन मध्ये बिझी आहोत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. कर्जत येथील मनसेच्या शिबिरात ते बोलत होते.
महापुरुषांच्या पुतळ्याला का हार घालायचे?
राज ठाकरे म्हणाले, जर आपण महापुरुषांचे ऐकणारच नाहीत. तर त्यांचा पुतळ्याला हार का घालायचे? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. शिवाजी महाराजांनी समुद्रामार्गे शत्रू येईल, असे सांगितले होते. त्यांनी त्यासाठी आरमार उभे केले. आज त्याच मार्गाने कसाब महाराष्ट्रात आला. आरडीएक्स महाराष्ट्रात आणले गेले. तरीही आपण महापुरुषांनी काय सांगितले आहे याचा विचार करत नाहीत.
गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा
राज ठाकरे म्हणाले, आज महाराष्ट्रात सहकार चळवळ उभी राहिली. आत्ताचे सहकार म्हणजे सरकार चळवळ नव्हे. आताचे सरकार म्हणजे सहारा चळवळ आहे. आमच्या ज्योतीराव फुलेंनी सहकार चळवळ उभी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये, यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी चळवळ सुरु केली. हा इतिहास विखे-पाटील, धनंजय गाडगीळ यांच्यापासून सुरु झाला. सहकार चळवळीत महाराष्ट्र 1 नंबरला आहे. त्यानंतर गुजरातचा नंबर आहे. गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे.
तर मराठवाड्याचा वाळवंट होईल
आपण इतिहासाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. मराठवाड्यातील पाण्याची परिस्थिती वाईट आहे. 800 ते 900 फूट खाली जाऊनही विहिरीला पाणी लागत नाही. तुम्ही मराठवाड्यात साखर कारखाने सुरु करत आहात. तिथे ऊसाचे पीक घेण्यास सुरुवात झाली. मराठवाड्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा तज्ज्ञांनी केलाय. या प्रदेशात वाळवंट झाल्यानंतर ती जमिन पूर्ववत करण्यासाठी 400 ते 500 वर्ष लागतील, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, आज आपण जाती जातींमध्ये भांडत आहोत. हे चालू नाही तर चालवलं जात आहे. यासाठी बाहेरची लोक प्रयत्न करत आहेत. जे महाराष्ट्रात चांगले आहे ते बाहेर काढा आणि जे बाहेर काढता येत नाही ते उद्धवस्त करा, असे बाहेरच्या लोकांचे धोरण आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केलाय. जगभरात जेवढी युद्ध झाली त्यालाच आपण इतिहास म्हणून वाचतो. कोणताही इतिहास भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही. युद्ध म्हणजे जमिन मिळवणे.
आपल्या नेत्यांना पाठीचा मणका नाही, ते मिंधे झालेत - ठाकरे
तुमच्या जमिनी काढून घेतल्या जातात, तुम्हाला काहीही समजत नाही. नवे रस्ते बनवण्यास सुरुवात झाली की, आपल्या जमिनी जातात. बाहेरच्या राज्यातील लोक जमिनी विकत घेतात. माझी मराठी बांधवांना विनंती आहे, आपल्या बाजूला काय सुरु आहे ? याबाबत सतर्क राहा. आपल्या विरोधात सहकार चळवळ सुरु आहे. आपले नेते मिंधे झालेले आहेत. त्यांना पाठीचा मणका नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या