एक्स्प्लोर

Maharashtra Politics : नोव्हेंबर गेला, जानेवारी पण हुकला, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली? विजय वडेट्टीवारांचा खोचक सवाल

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : विजय वडेट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवारांना छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात कधी येतील, असा खोचक सवाल करत निशाणा साधला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj's Iconic Tiger Claws : छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अॅल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघनखं ही भारतात आणण्यात येणार आहेत. आपल्या जाज्वल्य इतिहासातील अमूल्य ठेवा मायभूमीत परत यावीत याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी याबाबत माहिती दिली होती. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातचं ही वाघनखं (Wagh Nakh) महाराष्ट्रात येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. 

दरम्यान, त्यानंतर अनेक दिवस झाले असले तरी, वाघनखं अद्याप महाराष्ट्रात आलेली नाहीत. यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी  सुधीर मुनगंटीवारांना खोचक सवाल विचारला आहे. "नोव्हेंबर गेला, जानेवारी पण हुकला, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?" असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे.

सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?- विजय वडेट्टीवार

राज्य सरकारने लंडनमधील म्युझियमशी करार केला आणि वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वतः लंडनमध्ये गेले होते. आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारला जमलं नसलेलं काम, हे या सरकारने केलं आहे. ही वाघनखं महाराष्ट्रात 16 नोव्हेंबरपर्यंत येतीलल. असा दावा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता.

आता याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ट्वीट करत सुधीर मुनगंटीवारांना खोचक सवाल विचारला आहे. थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून, सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी करत तुम्ही वाघनखं आणायला लंडन पर्यटनाला गेले. येताना मात्र रिकाम्या हाताने परत आले होते. त्यानंतर वाघनखं नोव्हेंबरमध्ये येणार असं तुम्ही सांगितलं, तो महिना गेला. वर्ष संपले, 2024 उजाडले, आता जानेवारी पण हुकला! वाघनखं काही आली नाही. आता परत लंडनवारी करणार की, पुढची तारीख देणार? असं विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अॅल्बर्ट संग्रहालयात

शिवाजी महाराजांनी 15 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. अफजलखानाच्या वध केल्यानंतर शिवरायांना आदिलशाहीला नामोहरण करण्यासाठी बळ मिळालं होतं. दरम्यान,  शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला होता, ती वाघनखं ब्रिटनमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आग्रही आहे. ती वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अॅल्बर्ट संग्रहालयात आहेत. सर्व काही ठरल्याप्रमाणं घडलं तर या वर्षीच ही वाघनखं भारतात परत आणली जातील, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. 

शिवरायांची वाघनखं निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात आणणार? 

काँग्रेस पक्षाला आजवर ही वाघनखं महाराष्ट्रात आणता आली नाहीत. भाजप सरकार निवडणुकीच्या तोंडावर ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील आरोप करण्यात आले. असं असलं तरी, यामुळे निवडणुकीत याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 

हेही वाचा : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
Embed widget