Pune Sextortion : पुण्यात सेक्सटॉर्शनमुळे दोन आत्महत्या, दोन्ही आरोपी राजस्थानचे; राजस्थानातील हे गाव आहे सेक्सटॉर्शनचा अड्डा!
Pune Sextortion : सेक्सटॉर्शनमुळे एका 22 वर्षीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी एका आरोपीला पुणे शहर पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर या गावातून अटक केली आहे.
Pune Sextortion : सेक्सटॉर्शनमुळे एका 22 वर्षीय विद्यार्थ्याच्या (sextortion) आत्महत्येप्रकरणी एका आरोपीला पुणे शहर पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर या गावातून अटक केली आहे. ऑनलाईन फसवणूक करुन त्याचा नग्न व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली होती. पुण्यात दाखल झालेल्या सेक्सटॉर्शन प्रकरणात राज्यातील तरुणाला अटक होण्याची ही दुसरी घटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण मागील वर्षी 30 सप्टेंबर रोजी धनकवडी येथील तानाजी नगर येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला होता. त्याच्या भावाने 9 ऑक्टोबर रोजी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी 22 वर्षांचा आहे. तो राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील रायपूर सुकेती गावचा आहे. या गावातील अनेक तरुण अशाच ऑनलाईन गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहेत. त्याला पकडणे हे आव्हान होते. आमच्या टीमने राजस्थानमध्ये आठवडाभर मेहनत केली आणि शेवटी अटक केली, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
महिला असल्याचे भासवून तरुणाशी चॅटिंग
आरोपीचं वय 22 वर्षे आहे. तो पूर्ण राजस्थानचा भरतपूर रायपूर सुकेती गावाचा आहे. गावातील अनेक तरुण अशाच ऑनलाईन गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहेत. त्याला पकडणे हे आव्हान होते. आमच्या टीमने राजस्थानमध्ये आठवडाभर मेहनत केली आणि शेवटी केली, त्या आरोपीला अटक केली. तरुणाने आरोपी महिला असल्याचे समजून त्याच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. 30 सप्टेंबर रोजी मृताचे आरोपींसोबत सुमारे अडीच तास चॅट, व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉलिंग झाल्याचे पोलिसांना आढळले होते. चॅटिंग करत असताना आरोपीने पीडित तरुणाचा नग्न व्हिडीओ कॅप्चर केला आणि नंतर त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली, असे पोलिसांनी सांगितले. घाबरलेल्या पीडित तरुणाने फोनपेद्वारे अनेक ऑनलाईन व्यवहारांमध्ये 4,500 रुपये ट्रान्सफर केले होते आणि आणखी पैशाची मागणी करत होते. सहकारनगर पोलिसांनी गुन्हा करण्यासाठी आरोपीने वापरलेला मोबाईल नंबर वापरुन तांत्रिक तपास केला. पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि 384 (खंडणी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
गुरुकोठडी गावदेखील सेक्सटॉर्शनचा अड्डा
याआधीदेखील एका आत्महत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी सेक्सटॉर्शनच्या रॅकेटचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. या तपासात गुरुकोठडी हे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील संपूर्ण गावच सेक्सटॉर्शनचे रॅकेट चालवत असल्याचं उघड झालं होतं. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ तालुक्यातील गुरु कोठडी असं या गावाचं नाव आहे. या गावात पोहचल्यावर पुण्यातील मुलाच्या आत्महत्येस कारण ठरलेला आरोपी अन्वर खान याला ताब्यात घेतलं होतं.