एक्स्प्लोर

पुण्यात ओला कॅबमध्ये महिलेची प्रसूती, बाळासह आई सुखरुप

ओला कंपनीच्या व्यवस्थापनाला या घटनेची माहिती कळताच कंपनीने किशोरी आणि रमेश सिंग या दाम्पत्याला पुढील पाच वर्षे ओला कारची सर्व्हिस मोफत देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

पुणे : पुण्यात एका महिलेने ओला कारमध्येच मुलाला जन्म दिला. पुण्याच्या कोंढवा भागात राहणारी ही महिला तिच्या सासूसोबत तपासणीसाठी डॉक्टरांकडे निघाली होती. मात्र वाटेतच या महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या आणि हॉस्पिटलला पोहचण्याआधीच चालत्या कारमध्येच तिची प्रसूतीही झाली. किशोरी आणि रमेश सिंग आज अतिशय आनंदाने आणि समाधानाने त्यांच्या तीन दिवसांच्या बाळाला घेऊन हॉस्पिटलबाहेर पडले. हॉस्पिटलमधून त्यांना घरी पोहोचवण्यासाठी तोच ओला कॅबचा ड्रायव्हर आला होता, जो तीन दिवसांपूर्वी त्यांच्यासाठी अक्षरश: देवदूत ठरला. पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या सिंग दाम्पत्याला त्यांच्या पहिल्या अपत्याची चाहूल लागली आणि त्यांनी मंगळवार पेठेतील पुणे महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात तपासण्या सुरु केल्या. सोमवारीही किशोरी तिच्या सासूसह कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी निघाल्या. त्यासाठी ओला अॅपवरुन कार बुक करण्यात आली. मात्र गाडीत बसताच किशोरीना प्रसूती वेदना सुरु झाल्या आणि वाटेतच त्यांनी बाळाला जन्म दिला. ओला कॅबचे ड्रायव्हर यशवंत गलांडे यांच्यासाठीही हा कसोटीचा क्षण होता. कारण किशोरी प्रसूत झाल्या, त्यावेळी हॉस्पिटल अजून पाच किलोमीटर दूर होतं. पुण्याच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत तात्काळ हॉस्पिटलला पोहोचणं गरजेचं होतं. संध्याकाळच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत ही ओला कार अखेर कमला नेहरु हॉस्पिटलला पोहोचली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. ओला कंपनीच्या व्यवस्थापनाला या घटनेची माहिती कळताच कंपनीने किशोरी आणि रमेश सिंग या दाम्पत्याला पुढील पाच वर्षे ओला कारची सर्व्हिस मोफत देणार असल्याचं जाहीर केलं आहे. खरंतर भारतासारख्या महाकाय देशात कधी विमानात तर कधी रेल्वेमध्ये,  तर कधी चालत्या वाहनांमध्येही मुलांचे जन्म होत असतात. प्रवासादरम्यान काही घटकेचे सोबती असलेले प्रवासी या दरम्यान माणुसकीच दर्शन घडवतात आणि अडचणीत सापडलेल्या महिलेची आणि तिच्या कुटुंबाची सुटका करतात. यावेळी ही भूमिका चंद्रकांत गलांडे या कॅब ड्रायव्हरने पार पाडली.

महत्त्वाच्या बातम्या

Baramati  : मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, तर बारामतीत एका उद्योजकावर हल्ला, धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला
Baramati  : मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, तर बारामतीत एका उद्योजकावर हल्ला, धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक, शरद पवारांच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा, चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरेंसोबत व्यासपीठावर उपस्थित
पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक, शरद पवारांच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा, चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरेंसोबत व्यासपीठावर उपस्थित
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी काय केलं, स्टार्ट टू एंड चोख प्लॅनिंग, लोकल ट्रेनचा वापर, नेमकं काय घडलं?
टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी काय केलं, स्टार्ट टू एंड चोख प्लॅनिंग, लोकल ट्रेनचा वापर, नेमकं काय घडलं?
Jalgaon Accident News: जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले अन्..., नात्यातील तिघांचा दुर्दैवी अंत
जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले अन्..., नात्यातील तिघांचा दुर्दैवी अंत
Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Tiger Shroff Car Attack: अगदी जवळून सात राऊंड फायर झाले, तरीही टायगर श्रॉफ कसा वाचला? दोन महत्त्वाची कारणं, नेमकं काय घडलं?
अगदी जवळून सात राऊंड फायर झाले, तरीही टायगर श्रॉफ कसा वाचला? दोन महत्त्वाची कारणं, नेमकं काय घडलं?
Kolhapur Gokul Election 2026 Results: गोकुळच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, आज सत्तेचा फैसला होणार; महायुती की महाविकास आघाडी, कोण बाजी मारणार?
गोकुळच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, आज सत्तेचा फैसला होणार; महायुती की महाविकास आघाडी, कोण बाजी मारणार?
Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफच्या गाडीवर रात्री हल्ला; घटनेनंतरचा पहिला फोटो समोर, छाती अन् हातावर पट्टी, एकनाथ शिंदेंनी घेतली भेट
टायगर श्रॉफच्या गाडीवर रात्री हल्ला; घटनेनंतरचा पहिला फोटो समोर, छाती अन् हातावर पट्टी, एकनाथ शिंदेंनी घेतली भेट
Horoscope Today 19 October 2026 : आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
Tiger Shroff Car Firing Marathi News: टायगरवर हल्ला होताच एकनाथ घरी पोहोचले; प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा संतापला, म्हणाला, यालाच म्हणतात मीनाक्षी राजा पर्व!
टायगरवर हल्ला होताच एकनाथ घरी पोहोचले; प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा संतापला, म्हणाला, यालाच म्हणतात मीनाक्षी राजा पर्व!
Embed widget