PM Modi Pune Visit: पावसामुळे दौरा रद्द करावा लागला, पण PM मोदींना मेट्रोचं उद्घाटन आजच करावं लागणार?
PM Modi Pune Visit: मेट्रोची सिव्हील कोर्ट ते स्वारगेट ही मार्गिका आज सर्वसामान्यांसाठी खुली होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रद्द झालेला आजचा दौरा पुढच्या काही दिवसांत आयोजित करण्यात येणार आहे.
पुणे: आजचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा होणारा पुणे दौरा रद्द (PM Modi Pune Visit) करण्यात आल्याची माहिती आहे. मोदींच्या हस्ते आज सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार होते. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होते. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा करण्यात आला आहे. हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
मेट्रोचं उद्घाटन होणार का?
पावसामुळे दौरा रद्द करावा लागला, पण मेट्रोचं उद्घाटन होणार का? मेट्रो सर्वसामान्यांसाठी कधी खुली होणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. तर मेट्रोची सिव्हील कोर्ट ते स्वारगेट ही मार्गिका आज सर्वसामान्यांसाठी खुली होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रद्द झालेला आजचा दौरा पुढच्या काही दिवसांत आयोजित करण्यात येणार आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हस्ते मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. महायुतीच्या नेत्यांमध्ये झालेल्या विचार विनिमयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच उपस्थितीत मेट्रो मार्गिका सुरु करण्याबद्दल भाजपचे नेते आग्रही आहेत. त्यानंतर प्रशासनाला सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र हा मेट्रो मार्ग ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन करण्याची शक्यता देखील आहे.
पावसाची शक्यता असल्याने नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाला आहे. मात्र मेट्रोचं काम पूर्ण झालं आहे आणि लवकरात लवकर मेट्रो पुणेकरांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
पंतप्रधान मोदी हे आज (गुरुवारी) पुण्यात मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी येणार होते. एस.पी. महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी प्रचंड चिखल झाला होता. त्यामुळे पर्यायी जागा म्हणून गणेश क्रीडा कला केंद्राच्या सभागृहात मोदींची सभा घेण्याचा विचार सुरु होता. मात्र, या सभागृहातील कार्यक्रम खुल्या मैदानाच्या तुलनेत लहानच आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पुणे दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामळे पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे.
पुण्याच्या काही ठिकाणी रेड अलर्ट जारी
मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार होतं. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होते. याशिवाय सुमारे 22 हजार कोटींहून अधिकच्या विविध प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान मोदी करणार होते. दरम्यान पुण्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली होती, त्यामुळे पंतप्रधानांच्या सभास्थळी चिखल झाला होता, आजही पुण्याच्या काही भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्यावर पावसाचं सावट होते. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द करण्यात आला आहे.