एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यातील टेमघर धरणातून मोठी पाणी गळती, तडे गेल्याची भीती
पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली आहे. गंभीर बाब म्हणजे भिंतीतून वाहणारे प्रवाह अक्षरशः धबधब्याप्रमाणे वाहत आहेत. धरणाची भिंत उभारताना ड्रिलिंग आणि राऊटिंगचं काम न करण्यात आल्यामुळं ही गळती सुरू असल्याचं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे धरणाचं काम पूर्ण होऊन फक्त पंधरा वर्षेच लोटली आहेत. अविनाश भोसलेंशी संबंधित सोमा कन्स्ट्रक्शन आणि श्रीनिवास कन्स्ट्रक्शन या कंपन्यांनी धरणाचं काम पूर्ण केल्याची माहिती मिळते आहे.
टेमघर धरणाची क्षमता 3.75 टीएमसी इतकी आहे. टेमघरच्या गळतीमुळं धरण उभारणाऱ्या कंत्राटदारांचा आणि त्यांच्यावर निगराणी ठेवणाऱ्या जलसंपदा विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement