एक्स्प्लोर

Pune Porsche case : पुण्यातील धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून सोडणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाचे दोन सदस्य बडतर्फ

Pune Porsche case : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला तात्काळ जामीन देणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाच्या दोन सदस्यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे: पुण्यात कल्याणीनगर परिसरात झालेल्या हिट अँड रन प्रकरणाची राज्यासह देशाभरात चर्चा झाली. या प्रकरणात आणखी एक अपडेट आता समोर आली आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला तात्काळ जामीन देणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाच्या दोन सदस्यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एल.एन.धनवडे आणि कविता थोरात अशी या दोन सदस्यांची नावे आहेत. (Pune Porsche case)

हा भीषण अपघात झाला त्या 19 मे च्या मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगरमधे दारुच्या नशेत पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलीसांनी अटक करुन बाल हक्क न्याय मंडळासमोर हजर केले होते. मात्र एल. एन. धनवडे आणि कविता थोरात यांनी तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन त्या अल्पवयीन आरोपीची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर महिला आणि बालकल्याण विभागाकडून या दोघांची चौकशी करण्यात आली आणि त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. चौकशीत दोषी आढळल्यानंतर आता या दोघांना बाल हक्क न्याय मंडळावरून बडतर्फ करण्यात आलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलानं दारुच्या नशेत भरधाव वेगानं आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया (27 वर्षे) आणि अश्विनी कोष्टा अशी अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेल्यांची नावे होती. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात पोर्शे गाडीचा वेग इतका भरधाव होता की अश्विनी कोस्टा या 15 फूट दूर फेकली गेली. 

त्यानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालन्याय मंडळासमोर उभं करण्यात आलं. बालन्याय मंडळाने त्या अल्पवयीन मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची आणि इतर काही थातूरमातून शिक्षा दिल्या आणि जामीन मंजूर केला होता. 

कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोर्शे कार चालक अल्पवयीन मुलाला घटनेच्या अवघ्या 15 तासात 300 शब्दांचा निबंध लेखनासह विविध अटी घालत जामीन मंजूर करण्यात आला होता. हा जामीन ज्यांनी दिला त्या बालन्याय मंडळाच्या दोन शासकीय सदस्यांवर शिस्तभांगाची कारवाई करण्याची शिफारस महिला आणि बालविकास विभागाने सरकारकडे केली होती. अल्पवयीन आरोपीच्या जामिनाच्या निर्णयावर देशभरातून तीव्र प्रक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर महिला आणि बाल विकास आयुक्तांनी या सदस्यांच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. तसेच त्या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
Maharashtra Budget 2026: मेट्रो ते रस्त्याचे सहा पदरीकरण... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या?
मेट्रो ते रस्त्याचे सहा पदरीकरण... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या?
Maharashtra Budget 2026: अजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळाबाबत मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पातून A टू Z सांगितलं!
अजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळाबाबत मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पातून A टू Z सांगितलं!
Nitin Gadkari: 'मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ', पेट्रोलियम लॉबीविरोधात नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी
'मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ', पेट्रोलियम लॉबीविरोधात नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget