एक्स्प्लोर
पिंपरीत ज्येष्ठ नागरिकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
पिंपरी: पिंपरीमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला जिवंत जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्धव उनवने असं त्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी त्यांची पत्नी आणि जावयासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल पिंपरीतील नाशिक फाट्याजवळ भर दुपारी उद्धव उनवने यांच्या डोक्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, पोलीस तपासात उद्धव यांच्या बायको आणि जावयाचं नाव समोर आलं आहे.
उद्धव उनवने यांच्या खिशातून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्यात असं म्हटलं होतं की, ‘माझी पत्नी आणि जावयाकडून माझ्या जिवाला धोका आहे.’ या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement