Pune Toilet Seva App : पुणेकरांसाठी 'टॉयलेट सेवा ॲप; शहरातील स्वच्छतागृहाची माहिती आता एका क्लिकवर!
Pune : पुण्याच्या स्वच्छतेकडे आणि पुणेकरांच्या आरोग्याच्या दिशेने पुणे महापालिकेने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. या अंतर्गत शहरातील स्वच्छतागृहाची माहिती आता एका ॲपवर पुणेकरांना मिळणार आहे.
पुणे : पुण्याच्या स्वच्छतेकडे आणि पुणेकरांच्या (Pune News)आरोग्याच्या दिशेने पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation ) पावलं टाकायला सुरुवात केली आहे. या अंतर्गत शहरातील स्वच्छतागृहाची माहिती आता एका ॲपवर पुणेकरांना मिळणार आहे. पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधांसह माहिती देणाऱ्या ‘टॉयलेट सेवा ॲप’ (Toilet Seva App) चा पुढचा टप्पा महापालिकेने सुरु केला असून या माध्यमातून आता पुणे स्वच्छ ठेवण्यासाठी मदत होणार आहे.
‘टॉयलेट सेवा ॲप’ हे ॲप आता शहरातील 1183 सार्वजनिक शौचालयांची सविस्तर माहिती देते, ज्यामुळे वापरकर्त्यांना सुविधांबद्दल अभिप्राय नोंदविता येतो. तसेच केंद्र सरकारच्या सन 2023 च्या 'स्वच्छ शौचालय' उपक्रमाच्या अनुषंगाने 'स्वच्छ शौचालय स्पर्धा' आयोजित करण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.
ॲपवर जवळचे स्वच्छतागृह शोधण्याबरोबरच वॉश बेसिन, पाणी, लिक्विड सोप किंवा सॅनिटायझर, कचराकुंडी, लाइट, महिलांसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन्स आदी सुविधा असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती स्वतंत्रपणे उपलब्ध करुन दिली आहे. एक जानेवारी ते 30 जून 2024 या कालावधीत पुणे शहरात स्वच्छ स्वच्छतागृह स्पर्धादेखील घेण्यात येणार आहे.
'टॉयलेट सेवा ॲप'ची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती?
- वापरकर्ते जवळचे शौचालय शोधू शकतात आणि महिलांसाठी वॉश बेसिन, पाण्याची उपलब्धता, लिक्विड साबण किंवा सॅनिटायझर, डस्टबिन, दिवे आणि सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता यासारख्या सुविधांची माहिती मिळवू शकतात.
- हे अॅप वापरकर्त्यांना अभिप्राय देण्यास आणि शौचालय सुविधा आणि स्वच्छतेबद्दल तक्रारी नोंदविण्यास अनुमती देते.
- वापरकर्ते रेटिंग देखील देऊ शकतात.
- सध्या दहा हजारांहून अधिक नागरिकांनी अॅप डाऊनलोड केले आहे.
- नोव्हेंबरमध्ये सर्व शौचालयांमध्ये क्यूआर कोड बसविण्यात आले, ज्यामुळे आतापर्यंत 100 फिडबॅक सबमिशन झाले.
दिले.
'स्वच्छ शौचालय स्पर्धा' कशी असेल?
-ही स्पर्धा 1 जानेवारी ते 30 जून 2024 या कालावधीत होणार आहे.
- प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील पहिल्या पाच स्वच्छतागृहांची शहरस्तरावर निवड करण्यात येणार असून, त्यातील सर्वोत्कृष्ट तीन शौचालयांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
-'टॉयलेट सेवा अॅप' रेटिंग (30 गुण), अॅप वापर (30 गुण) आणि प्रत्यक्ष तपासणी (40 गुण) या गुणांकनावर आधारित गुणांकन केले जाणार आहे.
- प्रत्येक प्रभाग कार्यालय स्तरावर एक आणि केंद्रीय स्तरावर एक अशा पंधरा समित्या परीक्षा घेतील.
-या समित्यांमध्ये पालिकेचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि पत्रकारांचा समावेश असेल.
इतर महत्वाची बातमी-