Wrestling Federation of India : पद्मश्री रस्त्यावर अन् खेळाडूंनी कुस्ती सोडल्यानंतर मोदी सरकारला अखेर जाग; कुस्ती महासंघ नुतन अध्यक्षांसह निलंबित
Wrestling Federation of India : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याच्या घाईमुळे कुस्ती महासंघावर ही कारवाई करण्यात आली आहे. मंत्रालयाने WFI चे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांनाही निलंबित केले आहे.
नवी दिल्ली : बजरंग पुनियाने मिळालेला पद्मश्री रस्त्यावर ठेवल्यानंतर आणि साक्षी मलिक आणि विनेश फोगाटने कुस्ती सोडल्यानंतर मोदी सरकारला अखेर जाग आली असून भारतीय कुस्ती महासंघातील (Wrestling Federation of India) वादाची दखल घ्यावी लागली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आज (24 डिसेंबर) मोठी कारवाई करताना भारतीय कुस्ती महासंघ (WFI) या नवीन संघटनेची मान्यता रद्द केली आहे. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याच्या घाईमुळे कुस्ती महासंघावर ही कारवाई करण्यात आली आहे. मंत्रालयाने WFI चे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांनाही निलंबित केले आहे. संजय सिंह हे भाजप खासदार आणि WFI चे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.
Union Sports Ministry suspends the newly elected body of Wrestling Federation of India after the newly elected president Sanjay Singh announced U-15 and U-20 nationals to take place in Nandini Nagar, Gonda (UP) before the end of this year. pic.twitter.com/eMZyNK914Z
— ANI (@ANI) December 24, 2023
संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकली होती. ते अध्यक्ष होणार निश्चित झाल्यापासूनच गेल्या 11 महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी तीव्र आक्षेप घेतला. साक्षी आणि विनेशने कुस्ती सोडल्याचे जाहीर केले. बजरंग कुस्तीमधील राजकारणाचे वाभाडे काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार रस्त्यावर ठेवून दिले होते. कुस्तीपटूंनी संजय सिंह हे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे आहेत आणि अशा परिस्थितीत WFI मध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होण्याची आशा नाही, अशी भूमिका घेतली. मात्र, कुस्ती महासंघाची मान्यता आणि संजय सिंह यांना ज्या कारणासाठी निलंबित करण्यात आले, ही पूर्णत: वेगळी बाब आहे.
कारवाईची कारणे काय होती?
क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघ आणि त्याचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांना निलंबित केले. मंत्रालयाचे म्हणणे आहे की WFI ने विद्यमान नियम आणि नियमांकडे दुर्लक्ष केले आहे. अधिकृत प्रसिद्धीपत्रकात, क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे की राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा घाईघाईने करण्यात आली आणि नियमांचे पालन केले गेले नाही. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे ही स्पर्धा आयोजित केली जाणार होती, जे बृजभूषण सिंह यांचा बालेकिल्ला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या