एक्स्प्लोर

पुण्यात गॅस गळती होऊन स्फोट, सहा महिन्याच्या चिमुकलीसह तीन जखमी

पुण्यातील खराडी परिसरात गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने सहा महिन्याच्या चिमुकलीसह तीन जखमी झाले आहेत.

पुणे : गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने सहा महिन्याच्या बाळासह आई-वडील जखमी झाले आहेत. पुण्यातील खराडी परिसरातील संभाजीनगर येथे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शंकर भवाळे(वय 28)आशाताई शंकर भवाळे(वय 26)आणि स्वराली भवाळे(6 महिने)अशी जखमींची नावे आहेत. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या गॅसच्या स्फोटचा आवाज इतका मोठा होता, की आसपासच्या घरांनाही याची तीव्रता जाणवली. भवाळे कुटुंब खराडी येथील संभाजीनगरमध्ये राहतात. रविवारी रात्री हे कुटुंबीय झोपेत असताना घरातील गॅस गळती होऊन संपूर्ण घरात गॅस पसरला होता. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आशाताई उठल्या आणि त्यांनी पाणी तापविण्यासाठी गॅस पेटवला असता मोठा स्फोट होऊन आग लागली. हा स्फोट इतका भयानक होता की यामुळे चार घरावरील पत्रे उडून गेली. तर, स्वयंपाकघरातील ओट्याचेही यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या स्फोटाच्या आवाजाने शेजारपाजरच्या नागरिकांनी भवाळे कुटुंबीयांच्या घराकडे धाव घेतली. स्फोटामुळे घराचे उडालेले पत्रे -  पुण्यात गॅस गळती होऊन स्फोट, सहा महिन्याच्या चिमुकलीसह तीन जखमी या स्फोटानंतर लागलेल्या आगीत भवाळे पती-पत्नी आणि सहा महिन्यांची स्वराली भाजले आहेत. यातील सहा महिन्याच्या स्वरालीची प्रकृती गंभीर आहे. आगीमुळे घरातील सर्व साहित्य आणि कपडे जळाले आहेत. भिंतीवरील सिमेंटही खाली पडले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. तर, जखमी पती-पत्नी आणि मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅस गळतीमुळे स्फोट? गॅस सिलिंडरला गळती लागल्याने रात्रभर गॅस संपूर्ण घरात पसरला होता. त्यात घराची कोणतीही खिडकी उघडी नसल्याने हा गॅस घरातच कोंडून राहिला. त्यामुळे घरात एक प्रकारचा दबाव तयार झाला होता. त्यामुळे गॅस पेटवताना घरातील गॅसने आग पकडल्याने मोठा स्फोट झाला. घरातील गॅसचे प्रमाण जास्त असल्याने या स्फोटाची तीव्रताही अधिक होती. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, सकाळी गॅस पेटवताना घरातील दारे, खिडक्या उघड्या कराव्यात त्यानंतरच थोड्या वेळाने गॅस पेटवण्याचा सल्ला यातील तज्ज्ञांनी दिला आहे. Badlapur MIDC | बदलापूर एमआयडीसी कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू | ABP Majha
गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
ED Raid on I-PAC: पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
Gold Silver Rate : दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Embed widget