एक्स्प्लोर

देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना आसाममध्ये चार शक्तिशाली ग्रेनेड स्फोट

आज देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. दरम्यान आसाममधील दोन जिल्ह्यात चार शक्तिशाली ग्रेनेड स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.

गुवाहाटी : देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना आसाममधील डिब्रूगड आणि चरादेव जिल्ह्यात रविवारी सकाळी चार शक्तिशाली ग्रेनेड स्फोट झाले. डिब्रूगडमध्ये तीन आणि चराईदेवमध्ये एक स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितलं. या स्फोटात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच जोरदार धमाक्याचा आवाज आला. डिब्रूगड जिल्ह्यात एक स्फोट ग्रॅहम बाजारात झाला तर दुसरा एटी रोडवरील एका गुरुद्वाराच्या पाठीमागे झाला. दोन्ही भाग डिब्रूगड पोलिस ठाण्यांतर्गत आहेत. दुलिजन तेल शहरात दुसरा स्फोट झाला तिथून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक स्फोट चरादेव जिल्ह्यातील सोनारी पोलिस स्टेशन परिसरातील टिओक घाट भागात झाला. या स्फोटाचा आत्ता खुलासा झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ अधिकारी स्फोटस्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दिल्लीत कडेकोट बंदोबस्त - 71 व्या प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा दिल्लीतल्या राजपथावर पार पडला. या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या खास सोहळ्याला ब्राझीलचे राष्ट्रपती जायर मेसियास बोल्सिनारो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी पथसंचलनातून लष्करी सामर्थ्याचं जगाला दर्शन घडवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, दिल्लीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत येणाऱ्या सर्व बॉर्डरवर नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी ड्रोनची करडी नजर असणार आहे. दिल्लीतील सर्व प्रवेशाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. मेट्रोची पार्किंग सकाळपासून आज दुपार दोनपर्यंत बंद करण्यात आली आहे. देशभरातही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जम्मू काश्मीरच्या सर्वच जिल्ह्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि अन्य ठिकाणी पोलीसांची सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. Republic Day Parade | प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राजपथावर तिन्ही दलांचं शक्तिप्रदर्शन | नवी दिल्ली

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
Embed widget