एक्स्प्लोर
विचारला टोलचा प्रश्न, पाटील म्हणाले, मग राम कदमांचा प्रश्न विचाराल!
चंद्रकांत पाटील लोणावळ्यात विविध कामांच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी आले होते. यावेळी माध्यमांनी त्यांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल वसुलीबाबत प्रश्न विचारले.
पिंपरी चिंचवड : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोल वसुली थांबवण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. यावर राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, तुम्ही नंतर राम कदमांचा प्रश्न विचाराल, असं म्हणत काहीही बोलण्यास नकार दिला.
चंद्रकांत पाटील लोणावळ्यात विविध कामांच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी आले होते. यावेळी माध्यमांनी त्यांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल वसुलीबाबत प्रश्न विचारले. पाटील टोल वसुलीवर बोलले नाहीच पण राम कदम यांचा प्रश्न विचाराल असं म्हणत त्यांनी भाष्य करण्याचं टाळलं.
यानंतर माध्यमांनी फक्त टोल वर बोला, अशी विनंती केली. पण प्रत्येक विषयावर बोलत असतात का? असा प्रतिप्रश्न करुन टोल वसुलीवरही बोलणं टाळलं.
राम कदमांची पाठराखण काही दिवसांपूर्वीच बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या भाजप आमदार राम कदम यांची चंद्रकांत पाटील यांनी पाठराखण केली होती. "राम कदमांनी माफी मागितली आहे, त्यामुळे हा विषय आता संपायला हवा", असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. "राम कदम यांची पार्श्वभूमी पहिली तर महिलांना मदत करणारी आहे. हजारो महिला त्यांना राखी बांधतात. एखादं वाक्य चुकून गेलं तर त्याचा अर्थ काय होता? आणि जरी चुकीचा अर्थ निघत असेल, तरी त्यांनी आता जाहीर माफी मागितल्यावर विषय संपवायला हवा", असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे पुन्हा राम कदम यांचा विषय येऊ नये यासाठी चंद्रकांत पाटलांनी टोल वसुलीवरही बोलण्यास नकार दिला. निवडणूक लढवणार नाही हे वेगळ्या संदर्भाने म्हणालो: चंद्रकांत पाटीलमग राम कदमांचा प्रश्न विचाराल : चंद्रकांत पाटील! https://t.co/WqmvdOFcHx pic.twitter.com/ekm3HEaYAb
— ABP माझा (@abpmajhatv) September 12, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
क्राईम
क्रिकेट
राजकारण
Advertisement