एक्स्प्लोर
पुलंच्या घरात चोर घुसले, पुस्तकंच पुस्तकं पाहून पळाले!
पुलंचे भाचे दिनेश ठाकूर हे कामानिमित्त मुंबईला गेले असल्याने घर बंद होतं आणि हीच संधी चोरांनी साधली. मात्र, पुलंच्या घरात पुस्तकांव्यतिरिक्त काहीच नव्हतं. त्यामुळे चोरांच्या हाती काहीच लागलं नसल्याचा दावा दिनेश ठाकूरांनी केला.
पुणे : साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यातील घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडारकर रोडवर पुलंचं राहतं घर आहे.
घर बंद असताना सोमवारी पहाटे चोरांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटांचेही कुलूप तोडले. पुलंची हस्तलिखितं आणि पुस्तकं चोरांनी अस्ताव्यस्त केली. त्यापलिकडे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे तिथून त्यांनी पळ काढला.
शेजाऱ्यांच्या लक्षात हे सारं आल्यानंतर त्यांनी पुलंच्या नातेवाईकांना कळवलं. त्यानंतर पुलंच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सध्या तपास सुरु आहे.
पुलंचे भाचे दिनेश ठाकूर हे कामानिमित्त मुंबईला गेले असल्याने घर बंद होतं आणि हीच संधी चोरांनी साधली. मात्र, पुलंच्या घरात पुस्तकांव्यतिरिक्त काहीच नव्हतं. त्यामुळे चोरांच्या हाती काहीच लागलं नसल्याचा दावा दिनेश ठाकूरांनी केला.
दरम्यान, चार वर्षांपूर्वीही पुलंच्या घरात चोर घुसले होते. मात्र तेव्हाही त्यांच्या हाती काही लागले नव्हते. कारण पुलंच्या घरातील सर्व कपाटं केवळ पुस्तकं आणि हस्तलिखितांनीच भरली आहेत, अशी माहितीही पुलंचे भाचे दिनेश ठाकूर यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement