Dattatray Gade: दत्ता गाडे स्त्रीलंपट, तृतीय पंथीयांशीही ठेवायचा संबंध! इतरही कारनामे समोर, पोलिसांना फिरकी देण्याचा केला प्रयत्न पण...
Dattatray Gade: दरम्यान आरोपी दत्ता गाडेबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दत्ता गाडे स्त्रीलंपट, तृतीय पंथीयांशीही संबंध ठेवायचा अशी माहिती समोर आली आहे.

पुणे: स्वारगेट बस स्थानकातील लैंगिक अत्याचार प्रकरणी अपडेट समोर आली आहे. पीडित तरुणीचा न्यायालयात जबाब नोंदवला गेला आहे. इन कॅमेरा झालेला हा जबाब लिफाफा बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्यात आला आहे. तिच्या बाबतीत नेमका काय प्रकार झाला, हे जबाबात सविस्तरपणे मांडण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपी दत्तात्रेय गाडे याचा नुकताच पोलिसांनी जबाब नोंदविला, तसेच त्याची ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे. स्थानकाच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना 25 फेब्रुवारीला घडली होती. तरुणीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपी दत्ता गाडे याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली आहे. गाडेला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलिस कोठडीत असलेल्या गाडेचा जबाब शनिवारी पोलिसांकडून नोंदविण्यात आला होता. दरम्यान आरोपीबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दत्ता गाडे स्त्रीलंपट, तृतीय पंथीयांशीही संबंध ठेवायचा अशी माहिती समोर आली आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या घटनेला आज एक आठवडा पूर्ण झाला. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. धमकावून अत्याचार, तसेच विनयभंग केल्याचे गुन्हे केल्यास गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात यावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. या गंभीर घटनेच्या सहा दिवसांनंतर या प्रकरणाचा तपास पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हे शाखेला आरोपी दत्तात्रय गाडे याचा मोबाईल जप्त करण्यासाठी गुनाट गावात पथके पाठवून शोधमोहीम राबवणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, स्वारगेट पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याने गुन्हा करताना वापरलेली पँट सोमवारी (दि. 3) जप्त केली आहे. आरोपीला दोषी सिद्ध करण्यासाठी लागणारे सबळ पुरावे आता पुणे पोलिसांकडे आहेत.
गाडे स्त्रीलंपट, तृतीय पंथीयांशीही...
गाडेचे अनेक धक्कादायक कारनामे समोर आले आहेत. पोलिसांना तपासादरम्यान दत्तात्रय गाडेचे अनेक कारनामे समजले आहेत. याबाबत काही वृत्तसंस्थांनी सूत्रांच्या हवाल्यानुसार दिलेल्या माहितीनुसार, गाडे हा स्त्रीलंपट आहे. तो तृतीय पंथीयांशीही संबंध ठेवायचा. त्याने तपासात अनेकदा फेरबदल केले. सुरुवातीला त्याने आपण शरीरसंबंध ठेवण्यास सक्षम नसल्याचंही सांगितलं होतं. तर पीडित तरुणीवरच आरोप करत तिला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तपासात त्याने केलेले सर्व दावे फोल ठरल्याचे दिसले. त्याने पैसे देऊन संबंध ठेवल्याच्या दाव्यातही कोणतेही तथ्य आढळले नाही, असंही समोर आलं आहे. मात्र, त्याने केलेले दावे सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाल्यामुळे स्वारगेट घटनेतील पीडितेला मात्र, मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याच्या आणि त्याच्या वकिलाने केलेल्या या दाव्यावरून अनेक तर्क वितर्क लावले गेले, त्याचबरोबर एका राजकीय पक्षाच्या महिला नेत्यांनी देखील पोस्ट केल्याने खळबळ उडाली.
तपासामध्ये आरोपी दत्ता गाडेचा मोबाईल महत्त्वाचा
आरोपी दत्तात्रय गाडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याला गुन्हा केल्यानंतर पोलिसांना काय उत्तरे द्यायची ते चांगलंच माहिती आहे.. आरोपीने यापूर्वी देखील विवाहित महिलांचे दुसऱ्या पुरुषासोबत हॉटेलमधून, लॉजमधून बाहेर पडतानाचे व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड करत त्याआधारे ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्याने मोबाईलही लपवून ठेवल्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
