एक्स्प्लोर

Pune News: पैसे नसल्याने बिस्किटं खाऊन झोपायची वेळ; पुण्यात हलाखीच्या परिस्थितीत शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी मदतीचा हात

Pune Students: पुण्यात फिजिक्स विषयाचे मी शिक्षण घेते. माझं पहिलं वर्ष आहे पहिले काही महिने दोन वेळेचं जेवण मला शक्य नव्हते. त्यामुळे मी केवळ संध्याकाळी जेवायचे, अशी व्यथा एका मुलीने सांगितली. या संस्थेमुळे विद्यार्थ्यांना मदत.

पुणे: महाराष्ट्रात एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. अशा वातावरणात पुण्यात शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. गावाकडची हालाखीची परिस्थिती त्यामुळे पुण्यातील अनेक विद्यार्थी (Pune Students) असे आहेत तिथे सध्या एक वेळ जेवण करून आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. अशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुण्यातील हेल्पिंग हॅन्ड संस्थेने (Helping Hand) पुढाकार घेतला आहे. या संस्थेचे प्रमुख कुलदीप आंबेकर आणि संस्थेतील मुलांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यांच्या बोलण्यातून अनेक काळीज हेलावून टाकणाऱ्या कहाण्या समोर आल्या.     

मी विदर्भातील रहिवासी आहे. सध्या अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे आता वडिलांना मला पैसे पाठवणे शक्य होत नाही सध्या आर्थिक अडचणीचा आम्ही सामना करत आहोत. हेल्पिंग हँड्स या संस्थेच्या निमित्ताने माझी जेवणाची सोय झाली आहे. आम्ही अडचणीत आहोत. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढं यावं आणि आमच्या सारख्या अनेक विद्यार्थ्याची जी अडचण झाली आहे ती सोडवावी, असे आवाहन या संस्थेतील एका विद्यार्थ्याने केले. 

मागील सहा महिन्यांपासून पुण्यात आहे. येताना खिशात थोडेच पैसे होते. काही दिवसांमध्ये ते पैसे संपून गेले. त्यानंतर मात्र मोठी अडचण सुरू झाली अनेक वेळा केवळ बिस्किटं खाऊन संध्याकाळचा झोपलो आहे. गावची परिस्थिती ठीक नसल्यामुळे आई-वडिलांकडून पैसे मागू शकत नाही. त्यामुळे सध्या दिवस ढकलत आहे. विदर्भ मराठवाड्यातून येणारी अनेक मुलं इथं आहेत त्यांची परिस्थिती अतिशय भयावह आहे. त्यांची मदत व्हायला हवी. मोलमजुरी करणारी माझी आई तिला मी पैसे कसे मागू हा माझ्यासमोर प्रश्न आहे, अशी व्यथा आणखी एका विद्यार्थ्याने मांडली.

राज्य सरकारची शुल्कमाफीची योजना फसवी, विद्यार्थी लाभापासून वंचित

सध्या दुष्काळाची तीव्रता खूप आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी पुण्यामध्ये शिकायला येतात. स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्ड या संस्थेकडे तब्बल अडीच हजार मुलांनी आम्हाला जेवणाची सोय करा, अशी मागणी करणारे फॉर्म दिले आहेत. मधल्या काळात काही संस्थांनी मला मदत केली यामुळे मी आत्तापर्यंत केवळ 500 मुलांची व्यवस्था करू शकलो. जवळपास दोन हजार मुलं अशी आहेत जी केवळ एक वेळ जेवण करत आहेत. अनेक राजकीय व्यक्तींनी आम्हाला मदतीसाठी शब्द दिला. मात्र एकानेही आम्हाला मदत केली नाही. मानवाच्या नैसर्गिक गरजा मधील अन्न वस्त्र निवारा पैकी अन्नाची गरज पूर्ण होत नाही हे आता लक्षात येत आहे. खाणे आणि राहणे या दोन सोयी नसल्यामुळे अनेक मुलं शिक्षण सोडून माघारी गेली आहेत. 

सध्या सरकारने दुष्काळग्रस्त भागातील मुलांना फी माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक विद्यार्थी हा जीआर घेऊन ज्यावेळेस संस्थांकडे जातात. त्यावेळेस संस्था फी माफी द्यायला नकार देतात. त्यांचा असं म्हणणं असतं पहिले तुम्ही पैसे भरा आम्ही तुम्हाला फी परतावा देतो. ही माफीची निव्वळ फसवी योजना आहे .शुल्क माफीच्या निर्णयामध्ये जर एखादा विद्यार्थी स्कॉलरशिपचा लाभार्थी असेल तर त्याला हा निर्णय लागू होत नाही. मुळात स्कॉलरशिप या खूप कमी पैशाच्या असतात. अनेक विद्यार्थी अशा याची केवळ स्कॉलरशिपच्या जीवावरच पुढचं शिक्षण घेत आहेत. अशावेळी त्यांना फी माफी मिळाली नाही तर त्यांच्यासमोर अनेक अडचणी समोर उभ्या राहतात. मुळात स्कॉलरशिपचे पैसे शिक्षण सुरू असताना मिळतच नाहीत,  एक-दोन वर्षाने मिळतात अशी परिस्थिती आहे, असे कुलदीप आंबेकर यांनी सांगितले. 

आणखी वाचा

सातपुड्याच्या दुर्गम भागातील भीषण वास्तव; आजही विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरूच, अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कांपासून वंचित

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Embed widget