(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra : सातपुड्याच्या दुर्गम भागातील भीषण वास्तव; आजही विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरूच, अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कांपासून वंचित
Maharashtra : आजही आदिवासी दुर्गम भागातील लहान पाड्यांवर आणि वाद्यांवर शिक्षणाची गंगा पोचलेली नाही.
Nandurbar : केंद्र आणि राज्य सरकार शिक्षण हक्क कायद्याच्या (Right To Education) मोठ मोठ्या गप्पा मारत असते, जाहिरातींवर कोट्यावधीचा खर्च केला जात असतो, मात्र आजही आदिवासी दुर्गम भागातील लहान पाड्यांवर आणि वाड्यांवर शिक्षणाची गंगा पोचलेली नाही. नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा नदी काठावरील सदरीपाडा या ठिकाणी 45 ते 50 विद्यार्थी आहेत, शाळा नसल्याने इथले विद्यार्थी शिक्षणापासून दूर होते, मात्र समाजिक संस्था आणि गावातील शिक्षित दोन तरुणांनी गावात पडक्या कुडाच्या झोपडीत शाळा सुरु केली, मात्र या विद्यार्थ्यांची सरकार दरबारी कुठलीही नोंद नसल्याने पुढील शैक्षणिक भविष्य अंधारात आहे .
आजही सातपुड्याचा दुर्गम भागात शिक्षणासाठी मुलभूत सुविधा नाहीत
महाशक्ती, डिजीटल शिक्षण, कौशल्य विकास हे शब्द कानाला खूप छान वाटतात. मात्र आजही सातपुड्याचा दुर्गम भागात शिक्षणासाठी मुलभूत सुविधा नाहीत हे आपल्याला हे या पाड्यावर सुरु असलेल्या शाळेकडे पाहून खरं वाटेल. धडगाव तालुक्यातील उडद्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या पाड्यावर 70 ते 75 परिवार राहतात. या ठिकाणी शाळा, अंगणवाडी नाही, गावातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आण्यासाठी गावातील तरुणांनी शाळा सुरु केली, मात्र या गावातील विद्यार्थ्यांची शासन दरबारी नोंद नसल्याने अनेक अडचणी येत असतात येथील शिक्षक सांगतात.
शिक्षण घेणे ही काळाची गरज
शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून शासनाने प्रत्येक मुलगा, मुलगी ही शिकली पाहिजे या हेतूने इथल्या तरुणांनी शाळा सुरू केली आहे. प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे हा हेतू इथल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या नशिबी मुळी दिसतच नाही. शासन दरबारी नोंद नसल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे
या गावातील विद्यार्थ्यांची शासन दरबारी नोंदच नाही
या भागातील शिक्षणाच्या संदर्भात असलेल्या अनस्था सरकारी आकडेवारीने पुढे आणली आहे राष्ट्रीय बाल हक्क आयोग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सर्वेक्षणात एका गावात 6 ते 14 वयोगटातील 65 शाळाबाह्य बालके मिळून आलेत त्यावरून या भागातील शिक्षणाचा प्रश्न समोर आला आहे. जिल्ह्यातील सुमारे 952 गावे 902 पाडे आणि 98 वाडे असून दुर्गम भागातील बंद झालेल्या शाळेतून बालकांचे समायोजन शिक्षण विभाग करत असून 950 गावे आणि जिल्ह्यातील दुर्गम भागात 1 हजार वाड्या पाड्यांवर सर्वेक्षण होण्याची गरज आहे
हेही वाचा>>>
Vijay Wadettiwar : अभिषेक घोसाळकर हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा महिला किंवा पुरुष प्रवक्ता, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं बोट कुणाकडे?