Shirur Lok Sabha : मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याचं काम करणार, पुणे म्हाडाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर आढळराव पाटील नरमले?
Shivajirao Adhalarao Patil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जो उमेदवार देतील त्याचं काम आम्हाला काम करावं लागलं असं आढळराव पाटील म्हणाले.
पुणे : शिरूर लोकसभेसाठी (Shirur Lok Sabha Election) आग्रही असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांना म्हाडाचे (Pune MHADA) अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर आढळराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही समजता तसं काही नाही, मुख्यमंत्री जो उमेदवार देती त्याचं काम करणार अशी भूमिका आढळराव पाटलांनी घेतली. मला लोकसभा मिळाली नाही तरी चालेल, तिकीटासाठी कधीच मी फिरत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तसे काम करणार असं ते म्हणाले.
शिरूरच्या उमेदवारीवर बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी मला काम थांबवू नका असं सागितले आहे. पण जो पक्ष देईल तो आदेश मानणार, काम करणार. मी शिवसैनिक आहे,अर्थात धनुष्यबाणावर लढायला आवडेल. शिरूरमधून सुनेत्रा पवार किंवा वळसे पाटील उभा राहतील असं वाटत नाही. मी माझा जास्त वेळ माझ्या लोकसभा मतदारसंघात फिरत होतो, लोकांच्या अडचणी सोडवत फिरत होतो. आज म्हाडा अध्यक्षपद स्वीकारलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी टाकली. पण आपल्या सर्वांना वाटतं पत्ता कट झाला की काय? पण तसे काही नाही."
मुख्यमंत्री आणि अजितदादा सांगतील त्याचं काम करावं लागेल
शिरुरची जागा दोन नंबरची मतं घेतलेल्या शिवसेनेला जायला हवी, यावर आता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवतील. अजित पवार आणि मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याचं काम आम्हाला काम करावं लागलं असं आढळराव पाटील म्हणाले. मी शिवसैनिक आहे, अर्थात धनुष्यबाणावर लढायला आवडेल असंही ते म्हणाले.
म्हाडाचं काम चांगलं
म्हाडाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आढळराव पाटील म्हणाले, आपण समजत होतो किंवा लोक समजतात तसे नाही. संस्था कर्मचारी सगळं चागलं आहे, मुख्यमंत्र्यांनी स्वस्तात गोरगरिबांना घरं देण्यासाठी चागलं काम करण्याची संधी आहे.
अमोल कोल्हेंवर टीका
अमोल कोल्हे अपयश झाकण्यासाठी बेंबीच्या देठापासून भाषण करत आहेत असं सांगत आढळराव पाटील म्हणाले की, पाच वर्षात त्यांना काही जमलं नाही. मी मंजूर केलेली पाच बायपास रस्ते कामे माझीच आहेत. जो काम करत नाही ते क्रिडीट घेण्याच काम करत आहेत. बैलगाडा शर्यतसाठी मी काम केलं, त्यासाठी अनेकजणांनी आंदोलन केली आहेत. मी अमोल कोल्हे याच्यासारखे पक्ष बदलले नाहीत. अमोल कोल्हे यांनी अनेकदा पक्ष बदलले. ते नेते आहेत की अभिनेते त्याचे त्यांनाच माहिती. मी आहे त्याच शिवसेनेत आहे. मला लोकसभा मिळाली नाही तरी चालेल, तिकीटासाठी कधीच मी फिरत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तसे काम करणार.
ही बातमी वाचा: