Sawai Gandharva Mahotsav Pune 2023 : संगीतप्रेमी पुणेकरांची प्रतीक्षा संपली! सवाई गंधर्व महोत्सवाचाी तारीख ठरली, कधी असेल महोत्सव?
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी 13 ते 17 डिसेंबर 2023 दरम्यान संपन्न होणार आहे.
पुणे : पुण्यातील संगीतप्रेमी यांची प्रतीक्षा संपली आहे. पुणेकरांचा आणि त्यातच संगीतप्रेमींचा सगळ्यात आवडत्या महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी 13 ते 17 डिसेंबर 2023 दरम्यान संपन्न होणार असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळविली आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे हे 69 वे वर्ष असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे महोत्सव संपन्न होईल, असेही त्यांनी सांगितले.
यंदाच्या महोत्सवात नेमके कोणत्या दिग्गज कलाकारांचं गायन आणि वादन होणार आहे. यासंदर्भात अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही सुरांची चांगली मैफिल रंगणार आहे. अनेक संगीतप्रेमी पुणेकर या महोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. येत्या काही दिवसातच कलाकारांच्या नावांचीदेखील घोषणा होणार आहे. हे कलाकार कोण असणार आहे, याची आता पुणेकरांना अतुरता आहे.
महोत्सवासाठी येणाऱ्या रसिकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांसाठी सुसज्ज पार्किंग, कार्यक्रमाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता यावा यासाठी नेहमीप्रमाणे मोठ्या एलईडी स्क्रीन्स, अल्पोपहाराची सोय असणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आदी सुविधा महोत्सवाच्या ठिकाणी असणार आहेत. शिवाय मंडपाच्या एका बाजूस संगीत क्षेत्राशी संबंधित विविध उत्पादनांचे तर एका बाजूला प्रायोजकांचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. पुरुष आणि महिलांसाठी प्रसाधनगृह मंडपाच्या मागील बाजूस उभारण्यात येणार आहे.
महोत्सवाचं यंदाचं आकर्षण काय?
मागील वर्षीमहोत्सवात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी साजरी झाली होती. याचाच एक भाग म्हणून जुन्या जमान्यातील नामवंत प्रकाशचित्रकार वा. ना. भट यांनी पं. भीमसेनजींच्या तरुणपणी काढलेले तब्बल 18 फूट उंचीचे व्यक्तीचित्र रसिकांना पहायला मिळाले होते. तत्यामुळे मागील वर्षी हा महोत्सव रंगतदार झाला होता. यंदा मात्र या महोत्सवात वेगळं काय असणार आहे? संगीतप्रेमींसाठी काही नव्या संधी या महोत्वाच्या मार्फत उपलब्ध होणार आहे का?, असे अनेक प्रश्न संगीतप्रेमींच्या मनात आहे. येत्या काही दिवसांंतच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे आणि दरवर्षी प्रमाणे यंदाही संगीतप्रेमींसाठी हा महोत्सव पर्वणी ठरणार आहे.
इतर महत्वाची बातमी-