Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटीलला पळून जाण्यात राजकीय नेत्यांची मदत; आमदार रविंद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल
ललित पाटीलला पळून जाण्यात राजकीय नेत्यांनी मदत केली आहे. त्यात भाजपच्या एका मंत्र्याचा आमदारामचा समावेश आहे, असा हल्लाबोल आमदार रविंद्र धंगेकरांनी केला आहे.
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (lalit patil) मुंबई पोलिसांनी चेन्नईहून ताब्यात (Sasoon Hospital Drug Racket) घेतल्यानंतर पुण्याचे आमदार रविंद्र धंगेकरांनी ललित पाटील प्रकरणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. ललित पाटीलला पळून जाण्यात राजकीय नेत्यांनी मदत केली आहे. त्यात भाजपच्या एका मंत्र्याचा आमदारामचा समावेश आहे, असं ते म्हणाले.
भाजपच्या एका मंत्र्याचा गुन्हेगारांसोबत वावर आहे. तो मंत्री कोण आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. याच मंत्र्यांच्या मदतीने ललित पाटीलला पळून जाण्यात यश आलं आहे. तो पळून गेल्यानंतर पुणे पोलिसांनी 10 जणांचं पथक त्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या शहरात पाठवलं होतं. मात्र हा पुणे पोलिसांचा हाती लागला नाही तर मुंबई पोलिसांनी बंगळूरुहून चेन्नईला त्याला जेरबंद केलं. त्यामुळे येत्या काहीच दिवसात या सगळ्या मंत्र्यांची नावं पुढे येईल, असंही ते म्हणाले.
ललित पाटीलचा ड्रग्जचा मोठा व्यावसाय आहे, यातून ललित पाटील करोडो रुपये कमवतो. ससूनमध्ये असून त्याला पंचतारांकित सेवा मिळत होत्या शिवाय तो मुक्त संचारदेखील करत होता, हे सीसीटीव्हीदेखील समोर आले आहेत. मात्र ललित पाटील म्हणत आहे की तो पळाला नाही तर त्याला पळवला, यावर आता किती विश्वास ठेवायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. मात्र यात आता केंद्रीय समिती मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मागील 9 महिने संरक्षण देत असलेले पोलीस, ससूनचे डॉक्टर आणि येरवडा कारागृहातील अधिकारी यांना सहआरोपी करुन त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.
24 तास पोलिसांचा पहारा असणाऱ्या ससून रुग्णालयाच्या वॉर्ड नं. 16 मधून ललित पाटील याला पळवलं की तो पळाला हा प्रश्न कायम आहे. मात्र त्याला पाठीशी घालणारे ससूनचे डीन, पुणे पोलीस, येरवडा कारागृहातील पोलीस या सगळ्यांचं आता काय होणार आणि या सगळ्यांचा गॉडफादर कोण आहे, हे समोर येणं आता अपेक्षित आहे.
दरम्यान, काँग्रेसचे पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्वात आधी याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन, ससून ड्रग्ज प्रकरणात राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप केला होता. ललित पाटीलच्या पळून जाण्यामागे राज्यातील मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला होता. मात्र यावेळी त्यांनी कोणाचं नाव घेतलं नव्हतं. पण सुषमा अंधारे यांनी धंगेकरांच्या आरोपानंतर थेट दादा भुसे यांचं नाव घेतलं होतं.
इतर महत्वाची बातमी-
Lalit patil Drug Racket : कोण आहे ललित पाटील? नाशिकचा तरुण ड्रग्जच्या दुनियेत कसा आला?