एक्स्प्लोर

Lalit patil Drug Racket : कोण आहे ललित पाटील? नाशिकचा तरुण ड्रग्जच्या दुनियेत कसा आला?

ड्रग् माफिया ललित पाटील हा मुळचा नाशिकचा आहे. मात्र ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याने त्याची राज्यातीलच नाही तर विदेशात अनेक लोकांशी त्याची ओळख होती. 2020 मध्ये ललित पाटील ड्रग्जच्या रॅकेटमध्ये असल्याचं समोर आलं होतं.

पुणे : ड्रगमाफिया ललित पाटील हा श्रीलंकेत (Sasoon Hospital Drug Racket) पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ललित पाटील हा मुळचा नाशिकचा आहे. मात्र ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याने त्याची राज्यातीलच नाही तर विदेशात अनेक लोकांशी त्याची ओळख होती. 2020 मध्ये ललित पाटील ड्रग्जच्या रॅकेटमध्ये असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. 

ललित पाटीलला दोन मुलं...

ललित पाटीलचं बारावीपर्यंत शिक्षण झालं आहे. तो मुळचा नाशिकचा आहे. त्यांच्या कुटुबात त्याचे आई वडिल, भाऊ, पत्नी आणि दोन मुलं आहे. ललित पाटीलची पहिली पत्नी त्याला सोडून गेली त्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं होतं. मात्र दुसऱ्य़ा पत्नीचं अपघातात निधन झालं. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा आठव्या वर्गात शिकतो तर मुलगी नववीत शिकत आहे. या ड्रग्ज प्रकरणात त्याचा भाऊ भूषण पाटील देखील सहभागी होता. त्याला पुणे पोलिसांनी नाशिकमधून याच ड्रग्ज रॅकेटसाठी अटक करण्यात आली आहे. भूषण भूषणचं लग्न झालंय. भूषणची पत्नी गरोदर आहे, अशी माहिती भूषण आणि ललितच्या आईने दिलीये. तर भूषणचे वडील हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. युनायटेड इन्शुरन्स मध्ये ते कामाला होते. 

वाईन कंपनी ते ड्रग्ज रॅकेट...

ललित आधी वाईन कंपनीत कामाला होता. नंतर तीन ते चार वर्षे ललित परदेशी शेळी बोकड विक्रीचा व्यवसाय करत होता. तसेच टेलिफोन एक्सचेंजमध्ये देखील काम करत होता, अशी माहिती ललित पाटीलच्या आईने दिली. 2020 मध्ये समीर वानखेडे यांनी पालघरमध्ये ड्रग्ज रॅकेटवर छापा टाकला होता. त्यावेळी छोटा राजनचे साथीदार अरविंद कुमार लोहारे आणि राकेश खानिवडेकर या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांना जामीन मिळवण्यासाठी ललित पाटीलने मदत केली होती. मात्र त्यानंतर अरविंद कुमार लोहारे आणि राकेश खानिवडेकर या दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली. तेव्हा या दोघांचा तपास सुरु असताना  ललित पाटीलचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. 

अटक करण्यात आलेल्या तीन वर्षांपैकी 16 महिने ललित पाटील उपचारांचे कारण देऊन ससून रुग्णालयात ठाण मांडून होता. ज्या 16 नंबर वॉर्ड भोवती 24 तास पोलिसांचा खडा पाहरा असतो तिथपर्यंत मेफेड्रॉन आरामात पोहचत होता आणि ललित पाटील बसल्या जागी लाखों रुपयांचे व्यवहार करत होता. ललित पाटीलचा दुसरा अड्डा ससून हॉस्पिटलपासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेलं पंचतारांकित हॉटेल होता.

वेगवेगळी कारणं देत ससूनमध्ये ठाण

त्यानंतर वेगवेगळ्या आजाराची कारणं देत ससून रुग्णालयात ठान मांडून होता. कधी त्याला टीबी झाल्याचं, कधी पोटात अल्सर झाल्याचं तर कधी त्याच हर्नियाच ऑपरेशन करण्याची गरज असल्याचा अहवाल ससूनच्या डॉक्तरांनी दिला होता. मात्र एक्स रे काढायच्या बहाण्याने वॉर्ड नं. 16 मधून बाहेर पडला आणि थेट पसार झाला. 

इतर महत्वाची बातमी-

Lalit Patil Arrested: मला ससूनमधून पळवण्यात कोणाकोणाचा हात सगळं सांगणार; जेरबंद ललित पाटीलचा खळबळजनक गौप्यस्फोट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Virar Attack: विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhole Baba Hathras : रांगोळीसाठी महिला गोळा करतात भोलेबाबाच्या पायाखालची मातीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 03 जुलै 2024: ABP MajhaSensex Nifty : सेन्सेक्स , निफ्टी आजवरच्या सर्वोच्च पातळीवरABP Majha Headlines :  11:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Virar Attack: विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
Kolhapur News : जोतिबा डोंगरावर भलामोठा दगड रस्त्यावर घसरला; यमाई मंदिराकडे जाताना दगड रस्त्यात
जोतिबा डोंगरावर भलामोठा दगड रस्त्यावर घसरला; यमाई मंदिराकडे जाताना दगड रस्त्यात
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
Beed News: परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी
परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Embed widget