Baramati Gram Panchayat Election 2023 : बारामतीत गुलाल अजित पवारांचाच! भाजपचा एक सरपंच; 32 पैकी 22 ग्रामपंचायती अजित पवार गटाच्या ताब्यात,काटेवाडीच्या निकालाकडे लक्ष
Election : 32 पैकी 22 ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने झेंडा फडकवला आहे. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकींकडे लागलं असताना अजित पवार गटाने 32 पैकी 22 ग्रामपंचायतीवर विजय खेचून आणला आहे.
पुणे : राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकाचे निकाल हाती येत आहे. त्यात अजित पवारांच्या बारामतीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारामती तालुक्यातील एकूण 32 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, यातील मानाप्पावस्ती ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. 32 पैकी 22 ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने झेंडा फडकवला आहे. अजित पवारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर या ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकींकडे लागलं असताना अजित पवार गटाने 32 पैकी 22 ग्रामपंचायतीवर विजय खेचून आणला आहे. भोंडवेवाडी, म्हसोबानगर पवई माळ, आंबी बुद्रुक, पानसरे वाडी, गाडीखेल, जराडवाडी, करंजे, कुतवळवाडी दंडवाडी, मगरवाडी, निंबोडी, साबळेवाडी, उंडवडी कप, काळखैरेवाडी, चौधरवाडी, वंजारवाडी, चांदगुडेवाडी या गावात अजित पवारांचा गट विजयी झाला आहे.
32 पैकी 22 गावात अजित पवार विजयी...
1) मेडद , 2) कऱ्हावागज , 3) पवईमाळ, 4) धुमाळवाडी,5) म्हसोबानगर, 6)मानाप्पावस्ती (बिनविरोध), 7) चौधरवाडी, 8) करंजेपुल, 9) करंजे, 10)मुढाळे,11) सायंबाचीवाडी, 12)कोऱ्हाळे खुर्द , 13) मगरवाडी, 14) शिर्सुफळ, 15)गाडीखेल, 16) वंजारवाडी, 17) पारवडी, 18)उंडवडी कप, 19) निंबोडी, 20) जराडवाडी, 21) काटेवाडी, 22) साबळेवाडी, 23) गुणवडी, 24) डोर्लेवाडी, 25) सुपा, 26) दंडवाडी, 27) कुतवळवाडी, 28) चांदगुडेवाडी, 29) पानसरेवाडी, 30) काळखैरेवाडी, 31) आंबे बुद्रुक, 32) भोंडवेवाडी या 32 ग्रामपंचायतींपैकी 31 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यातील 22 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून, सर्व जागांवर अजित पवार गट विजयी झाला आहे. मागील काही वर्षांपासून बारामती तालुक्यात सातत्याने राष्ट्रवादीचा विजय होतो. यंदाही अजित पवारांचं वर्चस्व कायम दिसत आहे. बारामतीत अनेक ग्रामपंचायतीत अजित पवार गटाविरोधात अजित पवार गट उभा ठाकला असतो. त्यात जे पॅनल विजयी होतं ते अजित पवार स्वत:चं पॅनल असल्याचं सांगत असतात.
बारामतीत भाजपचा एक सरपंच विजयी...
बारामती तालुक्यात भाजपचा पहिला सरपंच विजयी झाला आहे. बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी येथे भाजपचा सरपंच विजयी झाला आहे. बारामतीत आत्तापर्यंत 23 गावांचा निकाल हाती त्यापैकी 22 राष्ट्रवादीकडे तर एका गावात भाजपचा सरपंच निवडून आला आहे.
शिरुरमध्ये अजित पवार गट विजयी, शरद पवारांना मोठा धक्का
त्यासोबतच पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या रांजणगाव ग्रामपंचायतवरती अजित पवार गटाचं वर्चस्व आहे. 13 जागांसह सरपंच पदावरदेखील अजित पवार गटाने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. शिरुरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. केवळ 3 जागांवरतीच शरद पवार गटाला समाधान मानावं लागलं आहे. पुणे जिल्ह्यात बाकी ग्रामपंचायती नेमक्या कोणाच्या ताब्यात जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-