Gram Panchayat Election Results LIVE Updates: नागपुरात भाजपची सरशी, 153 जागेवर वर्चस्व प्रस्थापित
Gram Panchayat Election Result LIVE: राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायतींंची मतमोजणी आज होतेय. या गावांना त्यांचा कारभारी मिळणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली.
LIVE
Background
Gram Panchayat Election Results 2023 LIVE Updates: आरोप-प्रत्यारोपाच्या तुरळक घटना वगळता रविवारी (5 नोव्हेंबर, 2023) ग्रामपंचायतीचं शांततेत मतदान पार पडलं. राज्यभरात अंदाजे 74 टक्के मतदान झालं. तसेच, राज्यभरातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींपैकी अंदाजे 185 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर पार पडणारी पहिलीच निवडणूक असल्यामुळे राज्यभरात चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.
राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायतींंची मतमोजणी आज होतेय. या गावांना त्यांचा कारभारी मिळणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यभरात जवळपास 74 टक्के मतदान झालं. आता सर्वांचं लक्ष लागलंय आजच्या निकालाकडे. ठिकठिकाणी अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेय. ग्रामपंचायतींवर कोण वर्चस्व गाजवतंय हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. ग्रामपंचायतींच्या निकालांचे सुपरफास्ट अपडेट एबीपी माझावर तुम्हाला पाहायला मिळणार.
5 नोव्हेंबरला सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान पार पडलं. तर मतमोजणी आज (सोमवारी, 5 नोव्हेंबर 2023) होणार आहे. मात्र गडचिरोली (Gadchiroli) आणि गोंदिया (Gondia) या नक्षलग्रस्त भागांत (Naxal Affected Areas) सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागांत 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल. राज्यात महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. मात्र आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे? हे या निवडणुकांतून आजमावता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व आहे.
Nagpur Gram Panchayat Election Results LIVE Updates: नागपुरात भाजपची सरशी, 153 जागांवर वर्चस्व प्रस्थापित
Nagpur Gram Panchayat Election Results LIVE Updates :
मतदान झालेल्या ग्रामपंचायती 361
आतापर्यंत निकाल लागले 361 ( आधीच अविरोध झालेल्या 4 ग्राम पंचायत धरून )
भाजप - 153
शिंदे गट -13
अजित पवार गट - 2
काँग्रेस - 96
शरद पवार गट - 47
उद्धव ठाकरे गट - 6
इतर - 44
Beed Gram Panchayat Election Results LIVE Updates: माजलगाव तालुक्यातील 32 ग्रामपंचायती पैकी 23 ग्रामपंचायतीवर आमदार प्रकाश सोळंके यांचे वर्चस्व.
Beed Gram Panchayat Election Results LIVE Updates: माजलगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे
माजलगाव तालुक्यामध्ये एकूण 42 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार होते मात्र यापैकी नऊ ग्रामपंचायती निवडणुकीवर मराठा समाजाचे आरक्षणाच्या प्रश्नावरून बहिष्कार टाकण्यात आला होता.
32 पैकी 23 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विजय मिळवला आहे..
मराठा आरक्षणावरून माजलगाव मध्ये जमा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांचा बंगला जाळण्यात आला होता त्यानंतर झालेल्या मतदानामध्ये प्रकाश सोळुंके यांची सरशी झाल्याचा चित्र पाहायला मिळत आहे..
सिमरी पारगाव ,मंजरथ, काळेगाव थडी ,मंगरूळ, रिधोरी ,घळाटवाडी, शिंदेवाडी ,कोथरूळ साळेगाव ,खानापूर, सांडस चिंचोली, तेलगाव खुर्द ,फुले पिंपळगाव, तालखेड ,टाकरवन, केसापुरी ,भाटवडगाव, वांगी, लवूळ, पात्रुड सर् वर पिंपळगाव, सोमठाणा ,लुखेगाव या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
Pune Gram Panchayat Election Results LIVE Updates : पुण्याचा ग्रामपंचायतींचा कौल
Pune Gram Panchayat Election Results LIVE Updates :
निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या: 231
निवडणूक रद्द : 2
निवडणूक झालेल्या : 229
पक्षनिहाय निकाल
भाजप : 34
शिंदे गट : 10
ठाकरे गट : 13
अजित गट : 109
शरद गट : 27
काँग्रेस : 25
इतर : 11
Nagpur Gram Panchayat Election Results LIVE Updates : नागपुरात आतापर्यंत लागलेले निकाल
Nagpur Gram Panchayat Election Results LIVE Updates :
मतदान झालेल्या ग्रामपंचायती 361
आतापर्यंत निकाल लागले 346
भाजप - 142
शिंदे गट -13
अजित पवार गट - 2
काँग्रेस - 96
शरद पवार गट - 43
उद्धव ठाकरे गट - 6
इतर - 44
Wardha Gram Panchayat Election Results LIVE Updates : हिंगणघाट तालुक्याच्या तीनही ग्रामपंचायतीवर भाजपाचा विजय
Wardha Gram Panchayat Election Results LIVE Updates : हिंगणघाट तालुक्याच्या शेगाव कुंड, उमरी आणि धामणगाव या ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवलाय. तीनही ग्रामपंचायत भाजपाचे सरपंच निवडून आलेत. शेगाव कुंड आणि उमरी या ग्रामपंचायतवर पहिले शेतकरी संघटनेच्या ताब्यात होत्या पण आता भाजपने यात विजय संपादन केले आहे.समुद्रपुर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या अंतिम निकालात तालुक्यात समिश्र कौल पाहवयास मिळाला आहे. तालुक्यात भाजपाला दोन,शिवसेना ठाकरे गटाला दोन, राष्ट्रवादी पवार गटाला दोन तर प्रहारला एका ठिकाणी सरपंच बसविण्यात यश आले आहे. निवडणुकीच्या निकाला नंतर कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर जल्लोष केला. या तालुक्यात भाजपाची जाम आणि बरफा या गावात सत्ता होती पण यंदा जाम येटगे ठाकरे गटाने तर बरफा येथे पवार गटाने आपली सत्ता स्थापन केली.