एक्स्प्लोर
मनसेतून काँग्रेसमध्ये गेलेले रविंद्र धंगेकर अपक्ष लढणार
पुणे : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेमधून काँग्रेसमध्ये गेलेले रविंद्र धंगेकर यांच्यावर अपक्ष निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. धंगेकरांना काँग्रेस पक्षाचं चिन्ह मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
अस्लम बागवान यांनी धंगेकरांच्या आधी निवडणूक अर्जासोबत ए.बी. फॉर्म सादर केला होता. मात्र छानणीवेळी अस्लम बागवान यांनी माघार घेतली. तरीही धंगेकरांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हाशिवाय अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.
रवींद्र धंगेकर पुण्यातील मनसेचे गटनेते होते. भाजपमध्ये प्रवेश करता-करता धंगेकर अखेर काँग्रेसच्या गोटात सहभागी झाले. धंगेकर यांच्या भाजप प्रवेशासाठी खासदार संजय काकडे आग्रही होते. मात्र धंगेकरांना भाजपमध्ये प्रवेश दिला तर राजीनामा देऊ अशी आक्रमक भूमिका पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतली.
दहा महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे महापालिकांवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
पुण्यातील मनसे नेते रवींद्र धंगेकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
पुण्यात तिकिट वाटपावरुन भाजप नेत्यांमध्ये हमरीतुमरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement