![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ravindra Dhangekar On Lalit patil Drug Case : ... तर ही शासनाची अन् पुणे पोलिसांची नाचक्की; ललित पाटील प्रकरणावरुन धंगेकर पुन्हा भडकले!
राज्यातलं मंत्रीमंडळ ललित पाटीलला वाचवत आहे आणि ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांनादेखील सरकार वाचवत असल्याचा आरोप आमदार रविंद्र धंगेकरांनी केला आहे.
![Ravindra Dhangekar On Lalit patil Drug Case : ... तर ही शासनाची अन् पुणे पोलिसांची नाचक्की; ललित पाटील प्रकरणावरुन धंगेकर पुन्हा भडकले! Ravindra Dhangekar On Lalit patil Drug Case MLA ravindra Dandekar allegations on state government lalit patil and sasoon dean sanjiv thakur Ravindra Dhangekar On Lalit patil Drug Case : ... तर ही शासनाची अन् पुणे पोलिसांची नाचक्की; ललित पाटील प्रकरणावरुन धंगेकर पुन्हा भडकले!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/243698ea0d28b0ae3bfd87c3ca9fb8901699508107219442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पुण्यातील आमदार रविंद्र धंगेकर ( MLA Ravindra Dhangekar ) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातलं मंत्रीमंडळ ललित पाटीलला वाचवत आहे आणि ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर (Sanjiv Thakur) यांनादेखील सरकार वाचवत असल्याचा आरोप आमदार रविंद्र धंगेकरांनी केला आहे. जर ललित पाटीलला शासन वाचवत असेल तर तर ही शासनाची आणि पुणे पोलिसांची नाचक्की आहे, असा हल्लाबोलदेखील त्यांनी केला आहे.
काय म्हणाले धंगेकर?
काही दिवसांपूर्वी मी पुणे पोलिसांची भेट घेतली त्यावेळी आयुक्तांनादेखील भेटून त्यांना ललित पाटीलचा तपास लवकर करा, असं आवाहन केलं. 9 महिने ललित पाटील ससून रुग्णालयात होता. त्या काळात ललित पाटीलने कोणाला पैसे दिले. कोणते डॉक्टर्स या प्रकरणात अडकले आहेत. ललितला कोणाचा वरदहस्त आहे.याचा तपास करण्याचं आवाहन केलं. पोलीस तपास करताना शासनाची मान्यता लागत नाही. ललित पाटीलकडे किती संपत्ती आहे. त्याचा तपास करणं किंवा त्याच्याकडे असणाऱ्या गाड्या आणि सोनं जप्त करणं हे पोलिसांचं काम असल्याचं ते म्हणाले.
ललित पाटीलला मंत्रीमंडळ वाचवत आहे...
धंगेकर म्हणाले, ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत तपासाच्या नावाखाली आतापर्यंत डीन सोबतच सगळे आरोपींना अटक व्हायला हवी होती, ही मागणी पुणे पोलिसांना केली आहे. नेमलेल्या समितीचा अहवानदेखील सचिवांकडे सोपवण्यात आला आहे आणि त्यालादेखील 10 ते 12 दिवस झाले तरीही हा अहवाल अजून प्रसिद्ध करण्यात आला नाही. त्यावर कारवाईदेखील करण्यात आली नाही आहे. याचा अर्थ शासन ललित पाटीलला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. येत्या अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा होणार आहेच. मात्र ललित पाटील प्रकरणात सरकार काही वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर ही शासनाची आणि पुणे पोलिसांची नाचक्की आहे.सर्वसमान्यांची मुलं ड्रग्जच्या विळख्यात अडकत आहे. ही मुलं या विळख्यातून बाहेर पडली पाहिजे. डीन संजीव ठाकूर आणि ललित पाटील यांनी संगनमताने ड्रग्जची विक्री केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
रोज नवे खुलासे समोर
ललित पाटील याला ज्यावेळी साकिनाका पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळीदेखील त्याने मोठे खुलासे केले होता. मी ससूनमधून पळालो नाही मला पळवण्यात आलं आहे, असं तो म्हणाला होता. त्याच्या या दाव्यामुळो मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पुणे पोलीस , येरवडा कारागृह प्रशासन आणि ससून व्यवस्थापक यांच्यावर संशयाची सुई वळली होती. मात्र त्यानंतर या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहे. ललित पाटील प्रकरणात त्याला मदत करण्याऱ्यांच्या संख्येत रोज भर पडत आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)